पारोळ्यात इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:33+5:302021-07-07T04:20:33+5:30
गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सामान्य लोकांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढ नियंत्रित ठेवण्यात अपयशी ठरले आहे. ...
गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सामान्य लोकांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढ नियंत्रित ठेवण्यात अपयशी ठरले आहे. या दरवाढीचा निषेध करीत सकाळी ११ वाजता एका लोटगाडीवर गॅस सिलिंडर, दुचाकी ठेवून व पेट्रोल संपलेली दुचाकी लोटत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. या वेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अडचणीच्या वेळी केंद्राने महाराष्ट्र सरकारला वाऱ्यावर सोडले. ७९ हजार त्रुटी असलेला मराठा आरक्षणाचा अहवाल फडणवीस सरकारने गत काळात मंजुरीसाठी पाठविला होता. ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचेही या वेळी त्यांनी बोलून दाखविले.
या वेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, नगरसेवक रोहन मोरे, पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, दिगंबर पाटील, दौलत पाटील, विजय पाटील, भास्कर पाटील, अनिल पवार, संतोष महाजन, किशोर पाटील, राकेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, भावी अनिकेत कोळपकर, प्रमोद पाटील, जिजाबराव पाटील, वना महाजन, मन्सराम चौधरी, गणेश पाटील, अंकुश भागवत, जिजाबराव पाटील, नगरसेवक राजेंद्र शिंदे, शहराध्यक्ष कपिल पाटील, मुकेश पाटील, अक्षय निकम, महिला अध्यक्ष सुवर्णा पाटील, सुनीता शेंडे, अन्नपूर्णा पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पवार, शिवाजी पवार, अनिल पवार आदी उपस्थित होते.
या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, रोहन पाटील, मनोराज पाटील, रोहन मोरे, दौलत पाटील, बाळू पाटील यांनी दिले.
060721\06jal_3_06072021_12.jpg
पारोळा येथे इंधन दरवाढी बाबत निषेध मोर्चा