तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची केली मागणी
By आकाश नेवे | Published: September 27, 2022 02:11 PM2022-09-27T14:11:15+5:302022-09-27T14:11:59+5:30
NCP protests against Tanaji Sawant: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याचा आरोप करत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे
- आकाश नेवे
जळगाव- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याचा आरोप करत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमात बोलतांना मराठा समाजाच्या विरोधात बेजबाबदार विधान केले. त्यानंतर सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन केेले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, सहकार सेलचे वाल्मिक पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, रमेश बाऱ्हे, शालिनी सोनवणे, जयश्री पाटील, इब्राहिम तडवी, प्रवक्ते योगेश देसले, अमोल कोल्हे आणि इतर उपस्थित होते.