‘ईडी’ने बजावलेल्या नोटिसीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:25+5:302020-12-28T04:09:25+5:30

राष्ट्रवादीचे महानगरध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक ...

NCP protests notice issued by ED | ‘ईडी’ने बजावलेल्या नोटिसीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

‘ईडी’ने बजावलेल्या नोटिसीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

Next

राष्ट्रवादीचे महानगरध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली असून, ३० डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. खडसेंची या व्यवहारप्रकरणी चौकशी झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस बजावल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या नोटिसीप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन, निषेध व्यक्त केला.

इन्फो :

भाजपकडून सुडाचे राजकारण

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत असून, हे खपवून घेणार नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहाराची यापूर्वीही चौकशी झाली असून, त्यांना क्लीन चिट दिली आहे. तरी ईडीने तातडीने नोटीस मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही अभिषेक पाटील यांनी सांगितले.

Web Title: NCP protests notice issued by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.