जळगावात दुचाकी लोटत राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:23 PM2018-08-30T17:23:35+5:302018-08-30T17:30:55+5:30
जळगाव: पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरूवारी राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी लोटत नेऊन दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले.

नूतन जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्याच आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयापासून दुपारी १२ वाजता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चाने निघाले. सर्वातपुढे जिल्हाध्यक्ष अॅड.पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा खजिनदार नामदेव चौधरी, रोहन सोनवणे, महिला प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, अरविंद मानकरी हे दुचाकी लोटत होते. तर त्यामागे बाकीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोदी सरकार व इंधन दरवाढीच्या घोषणा देत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचताच पोलिसांनी अडविले. वाहने बाहेरच लावून सर्वांना आत सोडले. मात्र जिल्हाधिकारी नसल्याने निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.