शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात, मविआ मिळून पराभूत करु; जयंत पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:26 PM2023-03-27T19:26:43+5:302023-03-27T19:28:12+5:30

'शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले'

NCP state president Jayant Patil criticized the BJP | शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात, मविआ मिळून पराभूत करु; जयंत पाटलांचा हल्लाबोल

शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात, मविआ मिळून पराभूत करु; जयंत पाटलांचा हल्लाबोल

googlenewsNext

जळगाव - शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राच्या चार दिवसाच्या दौर्‍यावर असून आज दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. 

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

सरकार आता निवडणुका होणार असल्याने बऱ्याच योजनांच्या घोषणा करेल पण प्रत्यक्षात काम दिसणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. राज्यात जे वातावरण आहे ते लोकांना पटलेले नाही. लोकांना प्रलोभने दाखवली जात आहेत पण लोक सजग झाले आहेत. त्यामुळे आपण लोकांना सक्षम पर्याय दिला पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रत्येक समाजघटकाचा पक्ष असून त्या सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे हे आपले काम आहे. एका महिन्यात बुथ कमिट्या पूर्ण करा. आपण चांगल्याप्रकारे संघटना राबवली तर यश हे आपलेच आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

सामान्य जनतेच्या समस्या अजून सरकार सोडवू शकलेले नाही. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत आपल्या बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पोहोचवा. आपल्या बुथ कमिट्यांमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती, दलित, अल्पसंख्याक या सर्व समाजघटकांना सामावून घ्या, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.  

मागील निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी बुथ कमिट्या पूर्ण झाल्या होत्या तिथे आपला निकाल चांगला होता. आपण मतदारांपर्यंत पोहोचायला हवे. समोरच्या बाजूकडे शक्ती आहे, धन आहे याचा विचार करू नका. लक्षात ठेवा युक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. युक्तीचा वापर करून जनतेला आपल्याकडे वळवा असंही पाटील म्हणाले.

Web Title: NCP state president Jayant Patil criticized the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.