सर्वपक्षीय संबध ठेवणाऱ्यांना ‘राष्ट्रवादी’ देणार नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:44 PM2018-08-20T17:44:11+5:302018-08-20T17:47:44+5:30

सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला.

'NCP' will give coconut to all parties | सर्वपक्षीय संबध ठेवणाऱ्यांना ‘राष्ट्रवादी’ देणार नारळ

सर्वपक्षीय संबध ठेवणाऱ्यांना ‘राष्ट्रवादी’ देणार नारळ

Next
ठळक मुद्देपक्ष संघटनेसाठी तालुकानिहाय बैठका होणारमागे काय झाले ते विसरून पक्षाच्या संघटनासाठी होणार प्रयत्नभाजपाचा विजय हा आयात उमेदवारांच्या बळावर

जळगाव : सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. तर व्यासपीठावर जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, कार्याध्यक्ष विलास पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार अरुण पाटील, दिलीप सोनवणे, दिलीप वाघ, माजी जि.प.सदस्य संजय गरूड, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, मधुकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सध्या पक्ष अडचणीत असून संघटन बांधणीचे महत्त्वपूर्ण आव्हान आपल्या समोर असल्याचे सांगितले. २६ ते २८ आॅगस्ट दरम्यान युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील हे जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय बुथकमिटीचा आढावा घेणार आहे. पक्ष संघटनासाठी बुथनिहाय १० कार्यकर्त्यांचे प्लॅनिंग करणार आहे. प्रत्येक तालुका, गट आणि गणातील कमिटी तयार करणार आहे. मागे काय झाले ते विसरून पक्षावर प्रेम करणाºयांना प्रोत्साहन देणार आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आपला विश्वासघात झाला. प्रभाग ८, ९ व १० मध्ये पोषक वातावरण होते. भाजपाचा विजय हा अन्य पक्षातील आयात उमेदवारांमुळे झाला आहे. सर्व पक्षांसोबत सलोख्याचे संबध ठेवणारा कार्यकर्ता असो की नेता त्यांना यापुढे नारळ देण्याचा इशारा त्यांनी दिला.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजही पोषक वातावरण असल्याचे सांगितले. महापालिका निवडणुकीत पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात त्याचा परिणाम होणार नाही. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न आणि समिकरणे वेगवेगळी असतात. कार्यकर्ता व पदाधिकाºयांनी आपले काम प्रामाणिकपणे केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचे देवकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांनी केले.

Web Title: 'NCP' will give coconut to all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.