राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:55+5:302021-08-22T04:20:55+5:30

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ...

NCP Women's Congress protests against fuel price hike | राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध आंदोलन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध आंदोलन

Next

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

भाजप सरकार केंद्रात आल्यापासून तेलाचे भाव, डाळीचे भाव, सिलिंडरचे भाव, पेट्रोलचे भाव वाढतच गेले. सामान्य नागरिक परेशान झाला आहे. आधीच या कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे कंबरडे पुरते मोडले आहे. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. कामधंदे ठप्प झालेले. दररोज होणारी भाववाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही.

भाववाढ मागे घेण्याची शिफारस आपण आपल्यास्तरावरून करावी, असे राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले आहे.

तहसीलदार मिलिंद वाघ यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, जिल्हा सरचिटणीस योजना पाटील, सचिव आशा चावरिया, तालुकाध्यक्ष मंदाकिनी पाटील, शहर अध्यक्ष अलका पवार, तालुका कार्यध्यक्ष आशा शिंदे, तालुका उपाध्यक्ष भारती शिंदे, वैशाली ससाणे, जलशालिनी महाजन, शहर अध्यक्ष मुख्तार खाटीक, युवक अध्यक्ष विश्वास पाटील, गुणवंत पाटील, रणजित पाटील, प्रकाश महाजन, सुनील शिंपी, उत्कर्ष पवार हजर होते.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिलांनी अग्निशामक दल व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.

Web Title: NCP Women's Congress protests against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.