महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:11 AM2021-07-04T04:11:52+5:302021-07-04T04:11:52+5:30
यावेळी केंद्र सरकारने चालवलेल्या हुकूमशाही कारभाराविरोधात निषेध करण्यात आला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीप ...
यावेळी केंद्र सरकारने चालवलेल्या हुकूमशाही कारभाराविरोधात निषेध करण्यात आला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी केंद्र शासनाचा महागाई, पेट्रोल आणि घरगुती गॅस दरवाढीविरोधात जोरदार टीका करीत चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी केंद्र सरकार अतिशय निष्क्रिय झाले असून सामान्य जनता महागाई आणि दरवाढीमुळे त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील, पाचोरा शहराध्यक्ष अजहर खान, भडगाव कार्याध्यक्ष हर्षल पाटील, नितीन तावडे, स्नेहा गायकवाड, अभिलाषा रोकडे, सरला पाटील, शालिग्राम मालकर, खलील देशमुख, गौरव पाटील यांनी मनोगत मांडले.
नायब तहसीलदार संभाजीराव पाटील यांना केंद्र सरकारच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे. यावेळी गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विजय कडू पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष जाधव, भडगाव शहर अध्यक्ष शामदादा भोसले, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शालिग्राम मालकर, ललित वाघ, नगरसेवक बाशिर बागवान, अशोक मोरे, अरुण पाटील, सतीश चौधरी, अविनाश सुतार, स्वप्नील पाटील, संदेश पाटील, विनोद तावडे, प्रकाश पाटील, सुदाम वाघ, रामधन परदेशी, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड, पाचोरा तालुका युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे, भडगाव तालुका युवक अध्यक्ष दक्षता पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, भडगाव महिला तालुकाध्यक्ष रेखा पाटील, भडगाव शहर महिलाध्यक्षा हर्षा पाटील, पाचोरा तालुका महिलाध्यक्षा रेखा देवरे, पाचोरा महिला शहराध्यक्षा सुनिता देवरे, ज्योती वाघ, सुवर्णा शिंदे, दीपमाला पाटील, सुनिता वारुळे, सरला पाटील, डॉ. अमृत पाटील, डॉ शेख अल्ताफ, अजय अहिरे, अरुण देशमुख, दीपक पाटील, नानाभाऊ पाटील, भगवान मिस्त्री, प्रदीप वाघ, नितीन पाटील, राजेंद्र ठाकरे, सय्यद तारीक सय्यद बशीर सत्तार, पिंजारी उमेश एरंडे, अरुण शालिक पाटील, अभिजित पवार, सचिन शिंदे, पंकज गढरी, गौरव पाटील, निलेश पाटील, तेजस पाटील, बंटी मगर, दिलावर तडवी, गुलाब तडवी, जाकीर तडवी, विलास पाटील, विलास सोनवणे उपस्थित होते.