चाळीसगाव वीज वितरण कंपनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Published: May 5, 2017 03:05 PM2017-05-05T15:05:33+5:302017-05-05T15:05:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी शुक्रवारी वीज वितरण कार्यालयात जात भारनियमन तातडीने बंद करा अशी मागणी केली.

NCP's Front on Chalisgaon Power Distribution Company's Office | चाळीसगाव वीज वितरण कंपनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

चाळीसगाव वीज वितरण कंपनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

Next

 चाळीसगाव, दि.5- शहरात अचानक भारनियमन सुरु केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी शुक्रवारी वीज वितरण कार्यालयात जात भारनियमन तातडीने बंद करा अशी मागणी केली. यावेळी संतप्त कार्यकत्र्यांनी अधिका:यांना जाब विचारत आंदोलनाचा इशाराही दिला.

उन्हाळ्याच्या दिवसात  शहरातील 132 केव्ही (11 केव्ही डेअरी परिसर) 33/11 केव्ही सी.टी.एम. (11 केव्ही घाट रोड, हुडको परिसर) 132 केव्ही चाळीसगाव (11 केव्ही शहर आणि सी.टी.एम) 33/11 केव्ही एम.आय.डी.सी (11 केव्ही जुने विमानतळ परिसर) या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आणि व्यापारी बांधवाचे हाल होत आहे.  
यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकूर, जगदीश चौधरी, दिपक पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिका:यांना धारेवर धरत समस्यांचे निवारण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला
यावेळी वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता एस.बी.जोशी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, सुर्यकांत ठाकुर, दीपक पाटील, फकीरा बेग, पं.स सदस्य अजय पाटील, सदाशिव गवळी किशोर पाटील, बाजीराव दौंड, छगन पाटील, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, किशोर पाटील, गौतम जाधव, बाजीराव दौंड, युवक उपाध्यक्ष निरज अजबे, विद्यार्थी शहराध्यक्ष शिवसागर पाटील, लक्ष्मीकांत चौधरी, प्रकाश पाटील, ऋषीकेश देशमुख,चंद्रराज पाटील,अजय पाटील, हृदय देशमुख, शुभम पवार, एजाज शेख तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP's Front on Chalisgaon Power Distribution Company's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.