कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीतर्फे ‘एक हात मदतीचा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:27 PM2020-09-17T15:27:51+5:302020-09-17T15:28:01+5:30
ज्या विद्यार्थ्यांचे वडील कोरोनाने मृत्यू पावले आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरू करण्यात आले आहे.
भुसावळ : ज्या विद्यार्थ्यांचे वडील कोरोनाने मृत्यू पावले आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानाचा प्रदेशाध्यक्ष सुनील जी. गव्हाणे यांच्या आदेशाने १५ रोजी महाराष्ट्रभर प्रारंभ करण्यात आला.
अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मयत झाले आहे अशा पाल्यांचा शिक्षणाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, भुसावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर सुनील दोडे, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत यांनी केली आहे.