नोटाबंदीविरोधात ‘राष्ट्रवादी’चे धरणे
By admin | Published: January 10, 2017 12:08 AM2017-01-10T00:08:57+5:302017-01-10T00:08:57+5:30
सरकारचा निषेध : जिल्हाधिका:यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
जळगाव : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार 9 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवित जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला जिल्हाध्यक्षा विजया पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष योगेश देसले, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, जिल्हा समन्वयक विकास पवार, विधीसेलचे अध्यक्ष अॅड.सचिन पाटील, केंद्रिय सदस्य कल्पना पाटील, राज्य सचिव मंगला पाटील, मिनल पाटील,
अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ इंगळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे,
युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, अर्चना कदम, सुवर्णा हेमकांत पवार, आशा येवले, निला चौधरी, अय्याज अली नियाज अली, सविता बोरसे, माधुरी पाटील, मनिषा देशमुख, ममता तडवी, दिलीप इंगळे, जयप्रकाश चांगरे, शितल साळी, अनिल खडसे, बाळू तांबे,
उज्ज्वल पाटील, रमेश पाटील, प्रदीप भोळे, आसिफ अन्वर, जितेंद्र चव्हाण, अजरुन पाटील, अकबर पहेलवान, संदीप पवार, अॅड.राजेश गोयर यांच्यासह पदाधिकारी धरणे आंदोलनात सहभागी झाले.
दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
केंद्र शासनाने चलनातून एक हजार व 500 रुपयाच्या नोटा रद्द केल्यानंतर जनता त्रस्त आहे. व्यापारी, शेतकरी, मजूर, कामगार व लहान मोठय़ा व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. बँक व एटीएमसमोरील रांगेत उभे राहिल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
नोटाबंदीविरोधात महिलांचा थाळीनाद
जळगाव : नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडली असून हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठय़ा उद्योगसमुहाकडून घेतलेल्या रोख रकमेचे स्पष्टीकरण द्यावे या मागणीसाठी शहर व जळगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालय व टॉवर चौकात थाळीनाद आंदोलन करीत निषेध नोंदविला.
नुकसान भरपाई द्या
जळगाव तालुका काँग्रेस (ग्रामीण) कमिटी महिला आघाडीतर्फे सोमवारी दुपारी अडीच वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. ज्योती संजय वराडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमोल निकम यांना दिले. आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय वराडे, कमलबाई लाड, येणाबाई कोळी, सरुबाई ढाकणे, सुवर्णा धुमाळ, आशा इखे, संगीता पढाळ, सविता पढाळ, आशा ढाकणे, लता पाटील, विमल पढाळ, पुनम पाटील, प्रतिभा घुगे, बेबाबाई वाघ, अक्काबाई वाघ, मनिषा वाघ, नंदा कोळी, वंदना कोळी, जि.प.सदस्य प्रा.संजय पाटील, कमल पढार, पमाबाई जाधव, सुरेखा पढार, सरला पढार यांच्यासह महिलांनी सहभाग नोंदविला.