अमृत योजनेत ‘मजीप्रा’चा खोडा

By admin | Published: January 10, 2017 12:01 AM2017-01-10T00:01:56+5:302017-01-10T00:01:56+5:30

मनपास पुन्हा पत्र : तिन्ही मक्तेदारांबाबत उपस्थित केले प्रश्न

In the nectar scheme, 'Mizapra' dug | अमृत योजनेत ‘मजीप्रा’चा खोडा

अमृत योजनेत ‘मजीप्रा’चा खोडा

Next

जळगाव : ‘अमृत’ योजनेंतर्गत मनपासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या 191.86 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्राप्त झालेल्या तिन्ही मक्तेदारांना आधी एक नव्हे तब्बल दोन वेळा तांत्रिकदृष्टय़ा योग्य ठरविणा:या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने (मजिप्रा) आता घुमजाव करीत काही प्रश्न उपस्थित करीत माहिती मागविली आहे. ही माहिती 7 दिवसात संबंधीत मक्तेदारांकडून मागवावी. 7 दिवसात उत्तर न आल्यास संबंधीत मक्तेदारास अपात्र ठरवावे (निविदा उघडू नये) तसेच माहिती मिळाल्यावर त्याची पडताळणी मनपाने करून या निविदाधारकांना पात्र, अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय मनपास्तरावरच घ्यावा, अशा सूचनाच सोमवारी मनपाला पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.
मनपाने अमृत योजनेच्या कामासाठी तीन वेळा निविदा जाहीरात प्रसिद्ध केल्यावर तिस:यांदा दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद मिळून तीन मक्तेदारांनी निविदा सादर केल्या. त्याबाबत मनपाने या योजनेसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून शासनाने नियुक्ती केलेल्या मजिप्राकडे विचारणा केली असता तिन्ही मक्तेदार तांत्रिकदृष्टय़ा योग्य असल्याचे कळविण्यात आले. मात्र पहिला लिफाफा उघडल्यानंतर तीन मक्तेदारांपैकी जैन इरिगेशनने अन्य मक्तेदार संतोष कन्स्ट्रक्शन्स  व विजय कन्स्ट्रक्शन्स (जे.व्ही.) यांच्याबाबतीत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत आक्षेप घेतला. त्यामुळे हा विषय थेट पाणीपुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयार्पयत पोहोचला. या विषयी मजिप्रच्या संचालकांकडे निर्णयासाठी हा विषय पाठविला. मात्र त्यानंतर मनपाला मोघम स्वरूपातील पत्र  आले. मनपाने स्पष्ट शब्दात अभिप्राय द्यावा, असे कळविले. त्यानंतर सोमवारी हे पत्र प्राप्त झाले. त्यातही आधी पात्रतेचा दाखला दिलेल्या तिन्ही मक्तेदारांवर मजिप्राने प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या पात्र, अपात्रतेचा निर्णय मनपास्तरावर घेण्याचे कळविले. मजीप्राला  सल्लागार म्हणून शुल्क का द्यायचे? हा प्रश्न मनपा प्रशासनाला पडला आहे.
‘मजीप्रा’ने उपस्थित केलेले मुद्दे
संतोष कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रा प्रा.लि. ठरेल अपात्र
1 मजिप्राने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मे. संतोष कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रा प्रा.लि. अॅण्ड विजय कन्स्ट्रक्शन या जॉईंट व्हेंचर मक्तेदाराची एकूण बिड कपॅसिटी अनुक्रमे 86.54 अधिक 55.50 कोटी अशी एकूण 142.04 कोटी इतकी येत आहे. मात्र निविदेतील  कामांची किंमत 191.86 कोटी आहे. त्यामुळे मे. संतोष कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रा प्रा.लि. अॅण्ड विजय कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.) यांची बिड कपॅसिटी निविदा किंमतीपेक्षा कमी असल्याने ही एजन्सी लिफाफा क्र.2 उघडण्यास अपात्र ठरत असल्याचे दिसत असल्याचे नमूद केले आहे. मात्र संबंधीत मक्तेदाराकडून म्हणणे मागविण्याची सूचना करण्यात आली आहे. जैन इरिगेशनने याच मक्तेदारावर आक्षेप घेतला आहे.
लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सव्र्हीसेस प्रा.लि. कोल्हापूर
2 मे. लक्ष्मी सिव्हील इंजिनियरिंग सव्र्हीसेस प्रा.लि.कोल्हापूर या मक्तेदाराने वर्षभरात केलेल्या तांत्रिक कामाचे आकडेवारीसोबत कामनिहाय माहिती सादर केलेली नसल्याचा तसेच या मक्तेदाराने यापूर्वी केलेल्या कामाच्या कागदपत्रांमध्ये काही कागदपत्र अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. 
जैन इरिगेशन सिस्टीम्स
3 जैन इरिगेशनने निविदेतील बीड कपॅसिटीच्या फॉम्यरुल्यातील ‘ब’ कॉलममधील माहिती भरताना एक्सीस्टींग कमिटमेंटच्या यादीतीत कोणत्याही योजनांच्याबाबत कार्यकारी अभियंता यांच्या प्रतिस्वाक्षरीचे दाखले सादर केल नाही, बीड कपॅसिटीच्या फॉर्ममध्ये केलेल्या कामांची किंमत या कॉलममध्ये केवळ वर्षभरातील महसूलाची माहिती दिली आहे. संबंधीत कामांची कामनिहाय माहिती सादर केलेली नाही, असे मुद्दे आहेत.

7 दिवसात मक्तेदारांना मजिप्राने केलेल्या सूचनेनुसार खुलासा मागवू. तो खुलासा आल्यावर मजिप्राकडून तपासून घेऊन पात्र-अपात्रतेबाबत शिफारस घेतली जाईल. जे मक्तेदार पत्रा ठरतील त्यांचे दुसरे पाकीट (बीड) उघडले जाईल. त्यातही दर जर निविदा दरापेक्षा अधिक असतील तर चर्चा करून तडजोड केली जाईल. अन्यथा फेरनिविदा मागवाव्या लागतील.
-जीवन सोनवणे,                       आयुक्त, मनपा

Web Title: In the nectar scheme, 'Mizapra' dug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.