मनपात शक्ती विसरलेल्या भाजपाला शक्तीची जाणीव करून देणा-या ‘जामुवंता’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:24 PM2018-12-01T12:24:43+5:302018-12-01T12:25:06+5:30
आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये ‘नामुष्की’ची प्रक्रिया कायम
अजय पाटील
जळगाव : महानगरपालिकेत सत्तेची सूत्रे हाती घ्यायला भाजपाला अडीच महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, भाजपाच्या विद्यमान सदस्यांमध्ये अनुभवाची कमतरता दिसून येत आहे. याचा प्रत्यय आतापर्यंत झालेल्या दोन महासभा व स्थायी समितीच्या सभांमध्ये पहायला मिळाला. महासभेत तब्बल ५७ नगरसेवकांचे ह्यबाहूबलह्ण असताना देखील भाजपावर विरोधकांसमोर मागे हटण्याची नामुष्की आलेली दिसून येत आहे.
सध्या महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाची स्थिती स्वत: मधल्या शक्तींची कल्पना नसलेल्या वीर हनुमानासारखी झाली आहे. लंका जाण्यापुर्वी हनुमानाला आपल्या शक्तींचे स्मरण करून देण्याचे काम ह्यजामुवंताह्णने केले होते. त्यानंतरच हनुमानाने लंका दहन केले. त्यामुळे मनपात ५७ नगरसेवक असताना देखील माघार घेण्याची नामुष्की ओढावणाऱ्या सत्ताधाºयांना आपल्या शक्तीची जाणीव करून देणाºया ह्यजामुवंताह्णची गरज आहे.
मनपा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासीक विजय मिळवत ५७ नगरसेवक विजयी झाले. मात्र, यामध्ये अनेक नगरसेवक हे पहिल्यांदाच महापालिकेत दाखल झाले आहेत. तर अनेक महिला नगरसेवक असल्याने अनुभवी नगरसेवकांची कमतरता भाजपामध्ये दिसत आहे. महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ आॅक्टोबर रोजी झालेल्या पहिल्याच महासभेत गाळेधारकांवरील ५ पट दंड रद्द करण्याचा मुद्यावरून धांदल उडालेली पहायला मिळाली. पहिल्याच महासभेत मनपाने मूदत संपलेल्या गाळेधारकांवर लावलेला ५ पट दंड रद्द करण्याचा ठरावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, प्रत्यक्ष सभेच्या वेळेस ५ पट दंड रद्द करण्याचा ठराव न करता त्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने केला. मात्र, समिती स्थापन करून देखील या समितीत सहभागी होण्यास भाजपा सदस्यांनी नकार दिला. परिणाम स्वरुप, आतापर्यंत समितीची एकही बैठक झाली नसून, गाळेधारकांना दिलासा देणाºया कोणत्याही निर्णयावर सत्ताधारी पोहचू शकले नाहीत.
त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपाने तब्बल ३५ कोटीच्या विकासकामांना मंजूरी दिली. मात्र, स्थायी समितीत भाजपाकडून गटनेते भगत बालानी यांच्या व्यतिरीक्त इतर सदस्यांना फारसा अनुभव नसल्याने भाजपाला फटका बसलेला दिसून आला. एकीकडे ३५ कोटीच्या कामांना मंजूरी देत असताना समता नगरातील ३० लाखाच्या विकासकामांचा प्रस्ताव नामंजुर केल्यामुळे भाजपाने विरोधकांना बोलण्याची संधी दिली. याच मुद्यावर स्थायी समिती गाजल्यामुळे भाजपावर विकासकामे रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला. या विषयावर कोंडी होताच आमदार सुरेश भोळे यांनी हा विषय पुढील स्थायी समितीत मंजुर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या दोन सभांमध्ये सत्ताधारी भाजपाला दोन विषयांवरून मागे हटण्याची नामुष्की ओढावली आहे.
पहिल्या महासभेत व स्थायी समितीत मागे हटण्याची ह्यनामुष्कीह्ण ओढावल्यानंतर निदान शुक्रवारी झालेल्या महासभेत तरी सत्ताधारी बोध घेतील असे वाटत असताना, सभेला सुरुवात होताच शिवसेना नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवकांचे नाव राजपत्रात आले नसताना, त्यांना या सभेत बसण्याची कायदेशिररित्या परवानगी नसल्याचे महापौरांकडून याबाबत निवार्ळा मागितला. मात्र, सेनेच्या केवळ १५ नगरसेवकांच्या खेळीने ५७ नगरसेवक असलेल्या सत्ताधारी भाजपाची भांबेरी उडालेली पहायला मिळाली. सेनेने टाकलेल्या या ह्ययॉर्करह्णवर भाजपा नगरसेवक क्लिन बोल्ड झालेले दिसून आले. मुळात प्रशासनाच्या चुकीमुळे भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकांना जरी बाहेर जावे लागले असते तरी बहूमताने भाजपाकडून अनेक विषय हानून पाडता आले असते. मात्र, केवळ ठराविक नगरसेवकांवर अवलंबून असलेल्या सत्ताधारी भाजपाने सभेला सामोरे न जाता, सभा तहकूब करण्यातच धन्यता मानली. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सभेत भाजपाची ह्यनामुष्कीह्णची प्रक्रिया कायमच आहे. निदान येणाºया महासभेत