संस्कृती संवर्धनासाठी मराठी रक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:38 PM2019-01-19T18:38:06+5:302019-01-19T18:39:35+5:30
मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले.
पाचोरा, जि.जळगाव : मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले.
येथील न्यायालयातपाचोरा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.एम.कादरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात ते बोलत होते.
यावेळी अॅड.अंकुश कटारे यांनी मृत्युपत्र या विषयावर उद्बोधन केले तर अॅड.शांतीलाल सैंदाणे यांनी तृतीयपंथीयांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक न्यायाधीश एम एच हक्क, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड.प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड.अविनाश सुतार, अॅड.एस. पी. पाटील, अॅड.डी.आर. पाटील, अॅड.आर.के.येवले, अॅड.सुनील पाटील, अॅड.सचिन देशपांडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड.प्रवीण पाटील यांनी, तर सूत्रसंचालन आणि आभार अॅड.रवींद्र पाटील यांनी मानले.