नेहरू युवा केंद्राने २० गावात एड्सबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:10+5:302021-02-13T04:17:10+5:30

जळगाव : जिल्ह्यात एचआयव्ही एड्स दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या माध्यमातून ...

Nehru Youth Center raises awareness about AIDS in 20 villages | नेहरू युवा केंद्राने २० गावात एड्सबाबत जनजागृती

नेहरू युवा केंद्राने २० गावात एड्सबाबत जनजागृती

Next

जळगाव : जिल्ह्यात एचआयव्ही एड्स दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २० प्रमुख गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र, जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातर्फे १ डिसेंबरला जागतिक एचआयव्ही एड्स दिनापासून जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली होती. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंडळ आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने २० खेड्यात पथनाट्ये सादर करून भित्तीचित्रे साकारण्यात आली. तसेच चित्रकला स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. एचआयव्ही एड्सविषयी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून बोरगाव, मंगरूळ, वाघडी, पिंपळगाव, पातोंडा, उंबरखेड, भादली, शिरसोली, धनपाडा, गंधाली, केऱ्हाळे, विवरे, निंबोल, अट्रावल, साकळी, चोरवड, उचंदा, वाकडी, खडका, नाडगाव या गावात जनजागृती करण्यात आली.

Web Title: Nehru Youth Center raises awareness about AIDS in 20 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.