जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात, १४ जण ठार
By चुडामण.बोरसे | Published: August 23, 2024 04:14 PM2024-08-23T16:14:54+5:302024-08-23T16:15:19+5:30
Nepal Bus Accident: अयोध्येहून काठमांडूकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होऊन त्यात जळगाव जिल्ह्यातील १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये ३० प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.
जळगाव - अयोध्येहून काठमांडूकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होऊन त्यात जळगाव जिल्ह्यातील १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये ३० प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.
अयोध्या येथे आयोजित शुरामकथेसाठी जळगाव जिल्ह्यातील काही भाविक गेले होते. कथेची सांगता झाल्यानंतर काही भाविक दोन बसेसमधून काठमांडूकडे निघाले. वाटेत पोखरा ते काठमांडू दरम्यान बस दरीत कोसळली. यात १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. हे सर्व जण भुसावळ तालुक्यातील वरणगाव, सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावचे रहिवासी आहेत.