नेरी नाका ते अजिंठा चौकापर्यंत २२ टपऱ्यांचे अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:27 AM2019-07-24T11:27:30+5:302019-07-24T11:28:01+5:30

कर्मचारी व अतिक्रमणधारकांमध्ये वाद

From Neri Naka to Ajanta Chowk, the encroachment of the 3 stages was done | नेरी नाका ते अजिंठा चौकापर्यंत २२ टपऱ्यांचे अतिक्रमण काढले

नेरी नाका ते अजिंठा चौकापर्यंत २२ टपऱ्यांचे अतिक्रमण काढले

Next

जळगाव : नेरी नाका ते अजिंठा चौकापर्यंतच्या रस्त्यालगत अनधिकृतरित्या थाटण्यात आलेल्या २२ टपऱ्यांचे अतिक्रमण मनपाकडून काढण्यात आले. या कारवाई दरम्यान, अनेक वेळा मनपा कर्मचारी व अतिक्रमणधारकांमध्ये वाद झाल्याने कारवाईत अडथळे आले. त्यामुळे संपुर्ण दिवसभरात केवळ २२ टपºया काढण्यात आल्या असून, बुधवारी देखील या भागात कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने आधीच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणाची भर पडल्याने वाहनधारकांना रस्त्यांवरून वाहने चालविणेही कठीण झाले आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाकडून मंगळवारी सकाळी १० वाजेपासून नेरी नाका ते अजिंठा चौकापर्यंतच्या रस्त्यावरील टपºया व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली.
अतिक्रमणधारकांच्या विरोधामुळे थांबली क ारवाई
इकरा कॉम्पलेक्सच्या पुढील टपºयांवर कारवाई करताना अतिक्रमणधारकांनी मनपा कर्मचाºयांना कारवाई करण्यास विरोध केला. आधी नोटीसा न दिल्यामुळे संताप व्यक्त मनपा कर्मचाºयांना शिवीगाळ देखील केली. तब्बल दिड तास गोंधळ सुरुच होता. मनपा कर्मचाºयांनी त्यांचा विरोध झुगारून थेट कारवाईला सुरुवात केली. अतिक्रमणधारकांनी आधी रस्त्यावर लावण्यात आलेल्या ट्रक हटविण्याची मागणी केली. त्यानंतरच टपºयांवर कारवाई करा असे सांगितले. त्यानंतर मनपा कर्मचाºयांनी सर्व ट्रक हटविल्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात केली.
आज पुन्हा कारवाई
मंगळवारी अतिक्रमणधारकांच्या विरोधामुळे कारवाईत वारंवार अडथळे आले. मात्र बुधवारी देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आली.
अतिक्रमणधारकांना नोटीस
मुदत संपलेल्या भंगार बाजारावर कारवाईसाठी अनेकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देखील कारवाई होत नाही. मंगळवारी कारवाईची अपेक्षा असताना मनपाने भंगार बाजाराला अभय दिल्याचेच दिसून आले. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी भंगार बाजाराची पाहणी केली. तसेच अजिंठा चौकालगतच्या पक्कया अतिक्रमणधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या

Web Title: From Neri Naka to Ajanta Chowk, the encroachment of the 3 stages was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव