कुरबुऱ्यांचा नवा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:50 PM2019-03-13T14:50:14+5:302019-03-13T14:51:30+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सहज सुचलं म्हणून या सदरात लिहिताहेत नंदुरबार येथील प्रसिद्ध साहित्यिक निंबाजीराव बागुल...

New class of puppies | कुरबुऱ्यांचा नवा वर्ग

कुरबुऱ्यांचा नवा वर्ग

Next

आजकाल समाजजीवनात कुरबुऱ्यांचा नवा वर्ग निर्माण झाला आहे. अकारण कुरबुरणं काही माणसांच्या स्वभावाचा स्थायीभाव असतो. एखाद्या फालतू विषयावर चर्चेचं गुºहाळ रंगवायचं. वेळेचा व्यय, अन् शक्तीचा क्षय करून स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यात काही माणसं तरबेज असतात त्यातच त्यांना पुरुषार्थ वाटतो. इतरांच्या सहेतूक चिंतेने व्याकुळलेली मने सदैव अस्वस्थ असतात. वास्तविक अशा प्रवृत्तीच्या लोकांना कुणाच्या कल्याणाची फिकीर नसते. वा अकल्याणाची पडलेली नसते. दुसºयाच्या कर्तृत्वावर निष्कारण जळणं आणि निरपराध्यांना छळणं ह्यातच त्यांना असुरी आनंद मिळतो. कपोलकल्पीत घटनेचं भांडवल करून जनमाणसात संशयाचं जाळं विनण्यात ही माणसं वाकबगार असतात.
समज-गैरसमजातून नाहक बदनामीचे मनसुभे रचले जातात. निष्कलंक माणसांचे चारित्र्य हनन करण्यातच त्यांना समाधान लाभतं.
समाजासाठी समर्पित जीवन जगणं त्यांच्या स्वप्नीही नसतं. मात्र कुणाच्या लोकमान्यता व राजमान्यता असलेल्या कार्याला कुरबुºया वर्गाच्या कृतीमुळे खीळ बसतो. त्यामुळे कर्तृत्वाच्या गरुड पंखांनी झेपावणाºया माणसांच्या शक्तीचा क्षय होत असतो. प्रगल्भ विचारांची गती मंदावते.
कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना चुका अपरिहार्य असतात. त्यावर समर्पक टीका जरूर झाली पाहिजे. कारण त्यामुळे चुकांच्या दुरुस्तीला संधी मिळते. परंतु अनावश्यक कुरबुरीतून विकास खुंटतो. हळव्या मनाची माणसं कर्तृत्वापासून फारकत घेतात ते समाजाचं न भरून येणारं नुकसान असतं.
समाजजीवनाच्या गतिमानतेमुळे काळाबरोबर सारी समीकरणे बदलत असतात. यशापयशाचं खापर प्रामाणिक माणसांच्या माथ्यावर फोडण्यातच कुरबुºया वर्गाला समाधान वाटतं. ‘त्यांनी ते चुकीचं केलं, त्यांनी हे केलं पाहिजे होतं. असं केलं असतं, तसं केलं असतं’ अशा नुसत्याच कर्तव्यशून्यतेच्या वाफा सोडून कुरबुरायचं असतं. अयोग्य, समाज व राष्ट्रविरोधी कृत्य निश्चितच टीकेस पात्र असतं. सार्वजनिक जीवनाला घातक असते. असत्याचा बुरखा फाडताना सत्याचा विपर्यास होऊ नये. एखाद्या कर्तबगारीवर चिखलफेक करून सत्याची गळचेपी करणं, अन्यायाला न्यायात तोलणं अशी कृत्य समाजाला घातक असतात. काही मंडळींना चांगलं असो की, वाईट कुरबुºया वर्गाला कुरबुरल्याशिवाय कात टाकलेल्या सापाप्रमाणं ही माणसं टवटवीत होत नसतात.
काही माणसांचं संदर्भहीन जगणं असतं. इतरांची कर्तबगारी त्यांना काटेरी वाटते. ती छाटून टाकण्यासाठी हा वर्ग आकाशपातळ एक करतो. कुणी कसं वागावं, कसं जगावं हा वैयक्तिक प्रश्न असला तरी समाजाला पचेल, रुचेल, साजेल असं वर्तनच माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवत असतं. कुरबुºया वर्गाच्या नजरेत सारं काही बिघडलेलं असतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्यांच्या ठायी सकारात्मक दृष्टिकोन नसतो म्हणून नकारात्मक विचारांची व्याधी त्यांना जडलेली असते. फक्त इतरांना दोष देतच जगावं हाच त्यांच्या जगण्याचा धर्म असतो.
हा कुरबुऱ्यांचा वर्ग समाजाला सदैव अस्वस्थ करीत असतो. त्यांना सर्वांगीण पतनाचा भास अस्वस्थ करतो. उत्कृष्ठ कार्याची प्रशंसा त्यांना अवघड वाटते. त्यांच्या व्यंगात्मक वर्तनाला ‘सत्यं, शिवंम्, सुंदरम्’ ही कुरुप वाटू लागतं.
जसं निरीक्षण, तसं परीक्षण असतं. ह्या कुरबुºया वर्गाला चांगल्या कामाचा उदो उदो सहन होत नाही. कुरबुºया वर्गाने साहित्य, राजकारण, सांस्कृतिक सामाजिक अशा बºयाच क्षेत्रात बस्तान ठोकलं आहे. देदीप्यमान कर्तृत्वाचं समर्थन करण्यास हा वर्ग काटकसरी असतो. समविचारी कुरबुºयांचा जमाव एका झेंड्याखाली जमतो. मग पाल्हाळ चर्चेला उधान येतं.
काही माणसं कर्तव्याशी एकनिष्ठ असतात. सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीच्या भावनेने कर्तव्यात समर्पित होतात. विधायक विचार, सकारात्मक दृष्टिकोन, समर्पणाची भावना असलेली माणसं अपयशातही यशाचा मार्ग शोधतात. पराभवानं नाऊमेद न होता विजयासाठी लढत असतात. मात्र कुरबुºयांचं रडगाणं इतरांच्या गुणदोषाच्या मूल्यमापनाशी निगडित असतं. त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा अवैचारिक पाझर त्यांच्या वर्तनातून झिरपत असतो. सभ्य माणसं कुरबुºया वर्गाच्या फंदात पडत नसतात. कुरबुºया वर्गाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून कर्तव्याशी बांधिलकी मानणारी माणसं प्रत्येक क्षेत्रात अयशस्वी होतात.
-निंबाजीराव बागुल, नंदुरबार
मोबाईल ९८५०६ ९०८७७

Web Title: New class of puppies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.