नव्याचे नऊ दिवस ठरु नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:34 PM2019-01-19T15:34:55+5:302019-01-19T15:35:55+5:30
नेहमीच दक्ष असायला हवे
हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त आणि कार्यतत्परतेच्या सूचना दिल्या. यानंतर कर्मचारी वेळेत येतात की नाही? तसेच कामे वेळेत करतात की नाही? याबाबतही आढावा घेवून हलगर्जी करणाºया कर्मचाºयांना नोटीसाही देण्यात आल्या. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. कर्मचाºयांना शिस्त लावण्यसाठी अधिकाºयांना बºयाचदा कठोर होणेही गरजेचे असते. मात्र ही कर्तव्यकठोरता बºयाच अधिकाºयांमध्ये अगदी सुरुवातीला नव्याने नियुक्ती नंतर आपली ओळख करुन देण्यासाठी व आपला प्रभाव पाडण्यासाठी दिसून येते आणि काही दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती जाणवते.
जिल्हा परिषदेत गेल्या वेळीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांनीही सुरुवातीला याचप्रकारे काम केले मात्र नंतर त्यांची पकड ढिली होत गेली. याच बरोबर सामन्य प्रशासन विभागाचा कार्यभार घेतल्यावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी देखील आपली चुनुक दाखवली. प्रशासनाचा एक भाग असलेला गणवेश शिपायांना सक्तीचा केला. यानंतर काही दिवस सर्व शिपाई हे गणवेशातहीदिसले. मात्र नंतर पुन्हा काही शिपायी हे रंगीत कपड्यात दिसून येत आहे. याकडे मात्र आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी हे वेळेवर कामावर येत नाहीत. कामाकडे दुर्लक्ष करतात... अशा अनेक तक्रारी आहेत. अशा बेशिस्त व हलगर्जीपणे वागणाºया कर्मचाºयांना वठणीवर आणण्यासाठी नव्याचे नऊ दिवसांचा प्रयोग नव्हे तर नेहमीसाठीच त्यांच्यावर योग्य ‘इलाज’ होणे गरजेचे आहे.