न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:20+5:302021-03-10T04:17:20+5:30
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी ...
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी स्कूलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी सन्मान मातेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंगळवारी वक्तृत्व निबंध स्पर्धा, बुधवारी अनुभव कथन तसेच गुरुवारी काव्यवाचन व शुक्रवारी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराणा प्रताप विद्यालय
दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचालित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा व प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक डी.एस. पाटील, डी.बी. सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन एस़ जी़ चौधरी यांनी केले.
राज प्राथमिक, माध्यमिक विद्यालय विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनीलभाऊ महाजन महाविद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका जयश्री महाजन यांच्या हस्ते माता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच नितीन मौर्य, रोहिणी सावकारे, तेजस्विनी ठाकूर, नूतन पाटील या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन जागतिक महिला दिनाची माहिती दिली. सूत्रसंचालन एस.एस. सुरवाडे यांनी केले, तर आभार डी.वाय.बऱ्हाटे यांनी मानले.
सुजय महाजन विद्यालय
जागतिक महिला दिनानिमित्त सुजय महाजन विद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रतीक्षा भोलाणकर, गौरव सरोदे, रविराज बंजारा या विद्यार्थ्यांनी भाषण दिले. सूत्रसंचालन पूजा आवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हितेंद्र पाटील यांनी केले.
मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालय
मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपशिक्षिका रूपाली वानखेडे, लीना नारखेडे, अर्चना धांडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई तसेच राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच प्रणाली गायकवाड, जयेश बाविस्कर, राकेश गायकवाड, प्रशांत कवळे, कृष्णा मराठे, खुशबू तडवी, गायत्री कवळे या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सूत्रसंचालन धनश्री फिरके यांनी केले तर आभार अविनाश महाजन यांनी मानले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला शिक्षिकांच्या सन्मानार्थ नारी सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होऊन मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपप्राचार्य रूपेश घाटगे यांनी मार्गदर्शन केले व स्त्री म्हणजे समर्पण व त्यागाचे दुसरे नाव असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाला उमा वाघ, जितेंद्र कापडे आदी उपस्थित होते. आभार हिरालाल गोराणे यांनी मानले.