कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील पुन्हा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:56 PM2020-08-22T12:56:39+5:302020-08-22T12:56:50+5:30

एकत्रित ९४ हजार पार : अ‍ॅण्टीजनचा अधिक वापर

A new high in one day of corona tests | कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील पुन्हा नवा उच्चांक

कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील पुन्हा नवा उच्चांक

Next

जळगाव : शुक्रवारी एका दिवसात तब्बल ४९९४ अहवाल समोर आले़ यात अ‍ॅन्टीजनच्या माध्यमातून ४२१६ तपासण्या करण्यात आल्या असून एका दिवसातील या आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या आहेत़ यातील ८७० रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत़ एकत्रित चाचण्यांच्या संख्यने ९४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ९४८०५ चाचण्या आतापर्यंत जिल्ह्यात करण्यात आलेल्या आहेत़
१३ जुलैपासून जिल्हाभरात अ‍ॅन्टीजन चाचणीला सुरूवात झाली़ लवकर निदान होत असल्याने याची लोकप्रियता वाढली व हळू हळू यांच्या तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली़ आतापर्यंत जिल्हाभरात ३६२२४ रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत़
असे असतात निष्कर्ष
रॅपीड अ‍ॅन्टीजन तपासणीत रुग्ण बाधित आढळून आल्यास त्याच्यावर लक्षणांनुसार उपचार सुरू केले जातात़ अ‍ॅन्टीजन चाचणीत रुग्ण निगेटीव्ह आला मात्र त्याला लक्षणे आहेत़ अशा रुग्णाची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते़ ज्यांना लक्षणे नाहीत त्यांची तपासणी निगेटीव्ह आल्यास त्याला निगेटीव्हच ग्राह्य धरण्यात येते़ आयसीएमआरच्या निर्देशांमध्ये या चाचण्यांबाबतचे असे निष्कर्ष स्पष्ट करण्यात आले आहेत़ आतापर्यंत या अ‍ॅन्टीजनच्या माध्यमातून ६८६८ बाधित रुग्ण समोर आले आहेत़

‘कोविड’चे तीन डॉक्टर कोरोना बाधित
कोरोनाशी लढणारी यंत्रणाच संकटात सापडत असल्याचे चित्र आहे़ कोविड रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तर औषध वैद्यक शास्त्रविभागाचे एक डॉक्टर प्रकृती खराब असल्याने नागपूर येथे परतले आहे़

Web Title: A new high in one day of corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.