भुसावळ येथे नवीन एलएचबी कोचेसला पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी तत्काळ परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:51 PM2018-12-17T23:51:44+5:302018-12-17T23:52:58+5:30

खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्ड चेअरमन आश्विन लोहानी यांची भेट घेतली. भुसावळ येथे ४७२ कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पेंडिंग आहे तिला परवानगी मिळावी. ज्यामुळे तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील, अशी मागणी खासदार खडसे यांनी केली.

New LHB coaches at Bhusawal get immediate permission to produce POH workshop | भुसावळ येथे नवीन एलएचबी कोचेसला पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी तत्काळ परवानगी मिळावी

भुसावळ येथे नवीन एलएचबी कोचेसला पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी तत्काळ परवानगी मिळावी

Next
ठळक मुद्देखासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन लोहानी यांची नवी दिल्लीत घेतली भेटतरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील

मुक्ताईनगर, जि.जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्ड चेअरमन आश्विन लोहानी यांची भेट घेतली. भुसावळ येथे ४७२ कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पेंडिंग आहे तिला परवानगी मिळावी. ज्यामुळे तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील, अशी मागणी खासदार खडसे यांनी केली.
या बैठकीत भुसावळ जंक्शन हे महाराष्ट्रातील अतिव्यस्त स्टेशन आहे. संपूर्ण भारतातून या ठिकाणी रेल्वे थांबतात. या ठिकाणी प्लॅटफॉर्म रिकामे नसल्यामुळे पॅसेंजरचा खोळंबा होतो यासाठी नवीन काम सुरू असणाऱ्या प्लॅटफॉर्मला परवानगी लवकरात-लवकर मिळावी यासाठी पत्र दिले.
पाचोरा - जामनेर या नॅरोगेज ट्रॅकचे रूपांतर ब्रॉडगेज ट्रॅकमध्ये व्हावे यासाठी खासदार खडसे सतत पाठपुरावा करत आहेत. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या नॅरोगेज ट्रेनचा प्रवास जलद व आरामदायक होण्यासाठी नवीन इंजिन, सर्व सुविधांनी युक्त नवीन प्रवासी डबे उपलब्ध करून सध्या चालू असलेल्या शटल व्यतिरिक्त एक नवीन फास्ट पॅसेंजर सुरू करण्यात यावी.
मुंबई आणि पुणे येथून भुसावळ विभागात प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असल्याने भुसावळ ते मुंबई सीएसएमटी आणि भुसावळ ते पुणे या दोन कायमस्वरूपी गाड्या सुरू करण्यात याव्या.
भुसावळ ते दिल्ली जलद प्रवास व्हावा या करता मुंबई ते दिल्ली व्हाया भुसावळ राजधानी एक्सप्रेस सुरू करावी यासाठी ट्रेनच्या वेगाची आवश्यक चाचणी काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेली आहे.
तसेच मलकापूर, नांदुरा, वरणगाव, रावेर, बोदवड येथील प्रवाशांच्या मागणीनुसार १२७१९/१२७२० जयपूर हैद्राबाद एक्स्प्रेसला मलकापूर येथे थांबा मिळावा. नांदुरा येथे १२१२९/१२१३० पुणे - हावडा, १९०२५/१९०२६ सुरत -अमरावती, १२८४३/१२८४४ पुरी अहमदाबाद, १२४०५/१२४०६ भुसावळ - हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा. वरणगाव येथे १२७१९/१२७२० जयपूर हैदराबाद या गाडीला थांबा मिळावा. रावेर येथे १२१४९/१२१५० सीएसएमटी ते वाराणसी, १२१४९/१२१५० पुणे ते दानापूर, १२७१५/१२७१६ अमृतसर ते नांदेड सचखंड एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, बोदवड येथे १२६५५/१२५५६ अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेसला थांबा मिळावा अशा प्रमुख मागण्या केल्या.

Web Title: New LHB coaches at Bhusawal get immediate permission to produce POH workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.