रद्दीच्या मोबदल्यात मिळणार नव्या वह्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:05 AM2018-10-26T04:05:25+5:302018-10-26T04:05:31+5:30
शालेय विद्यार्थ्यांना रद्दीच्या मोबदल्यात लवकरच कोऱ्या करकरीत वह्या मिळणार आहेत. ही संधी जळगावातील नमोआनंद अपसायक्लर्स प्रा. लि. या स्टार्टअप कंपनी व शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना रद्दीच्या मोबदल्यात लवकरच कोऱ्या करकरीत वह्या मिळणार आहेत. ही संधी जळगावातील नमोआनंद अपसायक्लर्स प्रा. लि. या स्टार्टअप कंपनी व शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात या दोघांमध्ये राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला.
वृक्षतोड टळावी व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जळगावातील कोठारी परिवाराने हा उपक्रम हाती घेतला. जितेंद्र व आनंद कोठारी यांनी नमोआनंदच्या माध्यामातून जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात ३६ दुकाने सुरू करून रद्दीच्या मोबदल्यात वह्या उपलब्ध करून दिल्या. दीड वर्षांपूर्वी ही योजना पुणे येथे महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे राबविण्यात आली होती.
>पर्यावरण रक्षणासाठी राज्यातील शाळांमध्ये रद्दीच्या मोबदल्यात वह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागासोबत करार झाला आहे.
-जितेंद्र कोठारी, संचालक, नमोआनंद
अपसायक्लर्स प्रा.लि.