बंदिस्त नाट्यगृहाचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:20 PM2018-09-04T22:20:26+5:302018-09-04T22:27:28+5:30

विश्लेषण

new theater's problem series | बंदिस्त नाट्यगृहाचे त्रांगडे

बंदिस्त नाट्यगृहाचे त्रांगडे

Next
ठळक मुद्देउद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्की पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे प्रशासनाची धावपळ

सुशील देवकर
जळगाव: शहरातील सांस्कृतिक क्षेत्राची अनेक वर्षांची मागणी असलेले बंदिस्त नाट्यगृह बांधून तयार असतानाही त्याच्या उद्घाटनास विलंबामुळे, कधी तळघराला गळती लागल्यामुळे तर कधी उद्घाटनाविनाच घाईगर्दीत सुरू केल्याची घोषणा केल्याने चर्चेत राहिले आहे.
आता हे बंदिस्त नाट्यगृह चालविण्याची जबाबदारी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर तर देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन पडली आहे. मात्र या देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे निधी खर्च करण्याची तरतूदच नसल्याने मिळेल त्या निधीतूनच काम करावे लागणार आहे. तर जिल्हाधिकाºयांना स्वत: यात लक्ष घालून नियमावली तयार करून घेण्यापासून ते डोअरकिपर ते व्यवस्थापकापर्यंत कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रक्रियाही पार पाडण्याची वेळ आली आहे. हे नाट्यगृह चालविण्यासाठी मक्तेदारच न मिळाल्याने नाट्यगृहाचे लोढणे जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गळ्यात पडले आहे.तर मनपाने आधीच हात वर केले आहेत.
उद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्की
लोकांसाठी केलेल्या सुविधेचे उद्घाटन वारंवार लांबणीवर पडल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने ती सुविधा उद्घाटनाविनाच खुली करण्याची वेळ दुसºयांदा आली आहे. यापूर्वी लांडोरखोरी वनोद्यानाचे काम पूर्ण होऊनही वनमंत्र्यांना वारंवार विनंती करूनही उद्घाटनाला यायला वेळ न मिळाल्याने लोकांना त्या सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच ऐनवेळी जाऊन या लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन केले. आता पुन्हा तीच वेळ बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्घाटनाअभावी ओढावली. पालकमंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. मात्र शिक्षक मतदारसंघ, मनपा निवडणुक आचारसंहितेमुळे तसेच नंतर मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचे दौरे रद्द झाले. मराठा आरक्षण आंदोलनानंतर तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडलेलेच नाहीत. त्यामुळे त्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत किती दिवस हे नाट्यगृह बंद ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर पालकमंत्र्यांनी रविवार, २ सप्टेंबर रोजी अचानकपणे अधिकाºयांच्या बैठकीत दुसºया दिवसापासून बंदिस्त नाट्यगृह लोकांसाठी खुले करण्यात येत असल्याची घोषणा करून टाकली.
प्रशासनाची धावपळ
पालकमंत्र्यांनी अचानक घोषणा करून टाकली मात्र बंदिस्त नाट्यगृहाची नियमावली देखील अंतीम झालेली नाही. तसेच त्याची देखभाल तसेच चालविण्याची जबाबदारी कोणावर द्यायची? याचा तसेच भाडे आकारणी किती करायची याचाही निर्णय झालेला नसतानाच दुसºया दिवसापासून नाट्यगृह खुले करण्याची घोषणा केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. स्वत: जिल्हाधिकारी हे नाट्यगृह चालविण्यास देण्यासाठी कर्मचारी नियुक्ती तसेच तिकिट आॅनलाईन विक्रीसाठी बँक प्रतिनिधींशी चर्चा आदी कामांमध्ये गुंतले असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीही अशाप्रकारचे आव्हान पेललेले असल्याने ते निश्चितपणे हे नाट्यगृह यशस्वी करून दाखवतील. मात्र त्यांच्याजागी बदलून येणाºया जिल्हाधिकाºयांनी हे त्यांचे काम नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली तर काय? असा सवाल निर्माण होत आहे.
आर्थिक गणित सोडविण्याची कसरत
या अवाढव्य वातानुकुलीत नाट्यगृहाचा वर्षभराचा देखभाल दुरूस्तीचा खर्चच ३० लाखांच्या आसपास असणार आहे. त्यादृष्टीने या नाट्यगृहातून उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. या नाट्यगृहाचे भाडे जास्त असणार हे जाहीर असल्याने किती कार्यक्रम होतील? हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी पार्र्कींगचा ठेका, कॅफेटेरिया, स्टॉल लावणे यासारख्या बाबींमधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: new theater's problem series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.