नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रीत : प्रा.ए.पी.कुलकर्णी
By admin | Published: April 25, 2017 05:52 PM2017-04-25T17:52:06+5:302017-04-25T17:52:06+5:30
घटकांना न्याय देण्याबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य देणारा नवीन विद्यापीठ कायदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख प्रा.ए.पी.कुलकर्णी यांनी धुळे येथील चर्चासत्राप्रसंगी केले.
Next
धुळे,दि.25- नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रीत असून विद्याथ्र्याची मते प्रत्येक निर्णयात घेतली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यापीठात विशिष्ट गटाचे प्राबल्य राहणार नाही. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य देणारा नवीन विद्यापीठ कायदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख प्रा.ए.पी.कुलकर्णी यांनी धुळे येथील चर्चासत्राप्रसंगी केले.
धुळे येथील विद्यापीठ विकास मंचतर्फे ङोड.बी.पाटील महाविद्यालयात मंगळवारी दुपारी 4 वाजता नवीन विद्यापीठ कायदा या विषयावर चर्चासत्र झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमविचे प्र.संचालक डॉ.पी.पी.माहूलीकर, जयहिंद संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण साळुंखे, , दिलीप पाटील, प्राचार्य डॉ.पी.एच.पवार उपस्थित होते. चर्चासत्राला संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.