नवीन उडीद, मूग खरेदी सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:50 PM2017-09-08T17:50:40+5:302017-09-08T17:53:35+5:30

जळगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत सोमवारपासून या हंगामातील उडीद, मुगाच्या खरेदीस प्रारंभ होत असून लिलावाद्वारे खरेदी करण्यात येणार आहे.

New Urad, Moong Purchase From Monday | नवीन उडीद, मूग खरेदी सोमवारपासून

नवीन उडीद, मूग खरेदी सोमवारपासून

Next
ठळक मुद्देलिलावाच्या दिवशीच शेतकºयांना मिळणार पैसे जळगाव कृउबाचा निर्णयउडीद ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.८,जळगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत सोमवारपासून या हंगामातील उडीद, मुगाच्या खरेदीस प्रारंभ होत असून लिलावाद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. शेतकºयांचा माल विक्री झाल्यानंतर तत्काळ रक्कम शेतकºयांना दिली जाणार असल्याची  माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

शेतकºयांसमोरच होणार लिलाव
बाजार समितीत  शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकºयांना मालाची रक्कम घेण्यासाठी अनेक फेºया माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतात. ही समस्या दूर करण्यासाठी तत्काळ पैसे अदा करण्याचा निर्णय  बाजार समितीने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी शेतकºयांसमोरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.  गेल्यावर्षी शेतकरी संघटनांकडून बाजार समिती प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आली होती.  

इन्फो-
उडीद ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत
सध्या बाजार समितीत नवीन हंगामातील मुग, उडीदची खरेदी नाही. जुन्याच मालाची सध्या खरेदी होत असून  उडीदाचे दर प्रतिक्विंटल ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत  असल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली. सोमवारपासून नवीन हंगामातील मालाची खरेदी सुरु होत आहे. लिलावात भाव ठरविला जाणार असल्याचे नारखेडे यांनी सांगितले. 

उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज
यंदा जिल्ह्यात पावसाची टक्केवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असली तरी पिकांना आवश्यक पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मुग,उडीदाच्या पिकांचे फार काही नुकसान झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मुग,उडीदाच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग काढणी केली आहे तर उडीदाची काढणी सध्या सुरु आहे. 

Web Title: New Urad, Moong Purchase From Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.