ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:23 AM2017-11-27T05:23:23+5:302017-11-27T05:23:52+5:30

ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यात ठिबकवर केळी ९९ टक्के तर व बागायती कापूस ५० टक्के घेतला जातो. त्यास फटका बसला आहे.

 The new weight of four thousand for drip irrigation | ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार

ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार

- विजयकुमार सैतवाल
जळगाव : ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यात ठिबकवर केळी ९९ टक्के तर व बागायती कापूस ५० टक्के घेतला जातो. त्यास फटका बसला आहे.
सरकार शेतकºयांना सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देते आहे, तर दुसरीकडे जीएसटी थेट तीनपट वाढविला आहे. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर ६ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागत होता. आता त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
अगोदरच कमी उत्पादन, शेतमालाला भाव नाही़ कर्जमाफीतील घोळामुळे पुन्हा पीक कर्ज न मिळाल्याने शेतकºयांच्या हाती पैसा नाही. सूक्ष्म सिंचनावरील कर वाढल्याने शेतकºयांनी हात आखडता घेतला आहे.
‘अँटी प्रॉफिटिंग’चा दिलासा
ठिबकवर १८ टक्के जीएसटी लागला असला, तरी पूर्वीचा ६ टक्के व्हॅट वजा जाता, थेट १२ टक्के भार वाढलेला नाही. १८ टक्के जीएसटी लागू करताना, कंपन्यांना ‘अँटी प्रॉफिटिंग’चा लाभ दिला आहे. त्यामध्ये कच्चा माल घेताना कंपन्यांना जवळपास ६ टक्के इनपुट मिळणार असल्याने कंपन्यांनी ठिबकचे भाव त्याप्रमाणात कमी केले आहेत. त्यामुळे किमान ६ टक्के खर्च कमी होण्याचा दिलासा मिळाला आहे. \

Web Title:  The new weight of four thousand for drip irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव