नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:37 PM2019-05-03T17:37:01+5:302019-05-03T17:38:27+5:30
भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर डीआरएम गुप्ता यांनी प्रथमच सर्व फलाटांची पाहणी केली. यात स्वयंचलित जिने, फूट ओव्हर ब्रिज, लिफ्ट सुविधा याबद्दल माहिती घेतली. सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत स्थानकासह दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या वाहनतळाची ही पाहणी केली.
वेटिंग रूम व स्थानकावर चार्जिंग पॉइंट वाढवण्याची केल्या सूचना
भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाटांची संख्या व प्रवासी गाड्यांची संख्या बघता चार्जिंग पॉईंट त्या मानाने फारच कमी आहेत. वेटिंग रूममध्ये तसेच फलाटांवर चार्जिंग पॉईंट वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
संपूर्ण फलाटांवर शेड उभारण्याच्या सूचना
फलाटाच्या लांबीच्या तुलनेत शेड पूर्णत: आच्छादन दिलेले नाही. गाडी आल्यानंतर इंजिनकडील डबे व शेवटचे डबे हे ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी शेड नसल्यामुळे उन्हाळ्यात, पावसाळ्यात प्रवाशांना तात्कळत उभे राहावे लागते. यासाठी संपूर्ण फलाटावर शेड उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.
नवीन फलाटावर पेयजल वर शेड टाकण्याची सूचना
नुकतेच रेल्वे स्थानकावर दोन नवीन फलाटांची उभारणी झाली या ठिकाणी असलेल्या पेजवर शेड नसल्यामुळे प्रवाशांना तीव्र उन्हामध्ये पिण्याचे पाणी भरावे लागते. शेडवर पेयजला वर शेड टाकण्याच्याही सूचना करण्यात आल्या.
स्थानकावर पाण्याचा वापर काटकसरीने करून स्वच्छतेविषयी तसेच स्थानकाबाहेर दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर असलेल्या नवीन उद्यानाची पाहणीही करण्यात आली. प्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान, तत्कालीन डीआरएम आर.के.यादव यांच्या कार्यकाळात झपाट्याने झालेल्या विकास कामातील काही कामांना ब्रेक लागला असून, यात उद्यान निर्मितीसह रेल्वे स्थानकासमोरील चौक आखणीचे कार्य प्रलंबित झाले आहे. नवनियुक्त डीआरएम गुप्ता यांनी याला गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.