वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा- एक तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:45 PM2018-12-03T13:45:30+5:302018-12-03T13:45:53+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत थोडं वेगळं लिहिताहेत चंद्रकांत अत्रे...

Newspaper Drama Review - A Star Workout | वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा- एक तारेवरची कसरत

वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा- एक तारेवरची कसरत

Next

नाट्यप्रयोग संपल्यानंतर दिग्दर्शक किंवा इतर नाट्य कलांवत-तंत्रज्ञ कलाकार यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळत नसते. त्यामुळेच शंकीत भाग सोडून देवून इतर भागावर फुलवत कलाकारांची त्यांच्या कलेची मांडणी समीक्षक करीत असतो आणि याच त्याच्या अपरिहार्यतेला मी तारेवरची कसरत म्हणतो.
याचे खरे कारण नाटक पाहून ते मनात पुरेसे मुरण्याची क्रिया ही झालेली नसते आणि वृत्तपत्रीय नाट्यप्रयोग समीक्षकाला नाटकाची संहिता मिळविण्यात येणारी अडचण ही एक मोठीच मर्यादा ठरत असते. कारण बहुतेक प्रयोग प्रायोगिक स्वरुपातील असल्याने त्यांची छापील संहिता (स्क्रीप्ट) नसते व संहिता केवळ परीक्षकांपुरत्याच मर्यादित असल्याने जितके वृत्तपत्रे तितक्या संहिता उपलब्ध करून देणे प्रयोगकर्त्याला शक्य नसल्याने समीक्षकाला प्रयोगातून दिसणारी संहिता हिच प्रमाणभूत मानून लिहावे लागते आणि असे होत असताना समीक्षकाच्या मनातील असलेल्या शंकाचे निरसन होत नाही. कारण नाट्य प्रयोग संपल्यानंतर दिग्दर्शक किंवा इतर नाट्य कलांवत-तंत्रज्ञ कलाकार यांच्याशी चर्चा करण्याची संधी त्याला मिळत नसते. त्यामुळेच शंकीत भाग सोडून देवून इतर भागावर फुलवत कलाकारांची त्यांच्या कलेची मांडणी समीक्षक करीत असतो आणि याच त्याच्या अपरिहार्यतेला मी तारेवरची कसरत म्हणतो.
म्हणूनच विश्वासार्ह व कसदार समीक्षा देण्याच्या उद्दिष्टाबाबत ठाम असल्यास इर्षात्मक स्पर्धेला थारा देता कामा नये हा माझा अनुभव आहे. कारण लिखाण आधी येतं की नंतर यापेक्षा ते किती सखोल विवेचनात्मक व कसदार आहे व गुणात्मक याचे महत्त्व जास्त असते, हे समीक्षण प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तपत्रांनी ध्यान्यात घेऊन याबाबतचा आग्रह धरणे योग्य राहील. कारण तातडीच्या प्रसिद्धीमुळे फार मोठे नफा- नुकसान वृत्तपत्रास होत नाही. याउलट दर्जेदार लिखाणाची कात्रणे रसिक-कलावंत, नाट्यप्रेमी संग्रहीत करीत असल्याने वृत्तपत्राच्या नावासह ती असल्याने संबंधित वृत्तपत्रांचाही तो गौरवच असतो. हे अधोरेखीत करण्याचे कारण एकच की, वृत्तपत्रीय नाट्य समीक्षा म्हणजे नाट्य-समीक्षा नव्हेच आणि असलीच तर ती दिवसापुरती असलेली मर्यादित आणि दुर्लक्षणीय आहे, असे बºयाच टीकाकारांचे आणि या क्षेत्रातील प्रस्थापित विचारवंतांचे मत असते. मात्र आश्चर्याचा भाग असा ही हिच मंडळी वृत्तपत्रात आपल्या नाटकाबद्दल काय छापून आले आहे हे उत्सुकतेने तपासून पाहत असतात.
समीक्षक हा प्रेक्षक आणि रंगकर्मी यांच्यामधील नाळ असतो ही नाळच तुटली तर दोघांनाही चकचकीत आरशातून आपल्या स्वत:च्या प्रतिमेचे निरक्षीरपणे पाहण्याचे भान राहत नाही. कारण समीक्षक तटस्थ वृत्तीने आपले ज्ञान अनुभव व अभ्यास याची सांगड घालून वेळप्रसंगी झालेल्या चुकांसाठी स्पष्ट मत नोंदवून पुढील प्रयोग अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करीत असतो. याबाबत माझा एक अनुभव ‘बॅलन्स शीट’ या प्रायोगिक नाटकाबाबत माझी परीक्षक या नात्याने कलाकार आणि लेखकाशी झालेल्या चर्चेनंतर काही नवीन बदल घडवून ते व्यावसायिक रंगभूमीवर आल्याने फलीत फार उत्तम होते.
नाट्य संमेलन वृत्तपत्रातून प्रसिद्धीसाठी मिळणाºया जागेवर मर्यादा येत असल्याने केवळ नाटकांची कथा अथवा कलाकारांची नावे मांडणे अपेक्षित नसते. तर समीक्षक हा रसीक नाटकावर प्रेम करणारा-अभ्यासू आणि श्रेष्ठ आस्वादक असल्याने जिथे दिग्दर्शकाचे काम संपते, तेथूनच समीक्षकाचे काम सुरू होते. म्हणजे नाट्यप्रयोग सादर झाल्यानंतर समीक्षक समोर घडणाºया घटनांचे अर्थ व त्यांचे होणारे परिणाम याचा मनाशी चिकित्सक बुद्धीने विचार करून तर्क बुद्धीने त्यावरील सखोल विवंचनेतून ज्ञान अनुभव आकलनाद्वारे समीक्षा मांडणी करीत असतो. म्हणूनच केवळ खोटे कौतुक किंवा लिहण्याचे स्वातंत्र्य असल्याने जखम करणारी शब्द मांडणी करू नये.
लेखकाने लिहलेले दिग्दर्शक ते रसिकापर्यंत पोहोचवताना कलाकारांच्या प्रतिमेचा व तांत्रिक अंगाचा योग्य वापर झाला आहे का? याची दखल घेऊन केलेली समीक्षा आणि त्याचवेळी हे सर्व समीक्षण रंगकर्मीनाही उपआयुक्त व लक्षणीय महत्त्वाचे वाटले पाहिजे. म्हणूनच शब्दांचा यथायोग्य वापर व सुत्ररुपाने उतरविल्याची क्षमता यातच वृत्तपत्रीय समीक्षणाची यथार्थता व गुणवत्ता ठरत असते.
सर, तुम्ही लिहिलेल्या समीक्षणाचे कात्रण अजून ही मी जपून ठेवले असल्याचे सांगत १५-१६ वर्षानंतरही कात्रणे दाखविणारे रंगकर्मी-विद्यार्थी भेटतात. तेव्हा कुठे तरी आपल्या समीक्षणाचा उपयोग व दखल घेतली जात असल्याचा सार्थ आनंद वृत्तपत्रीय समीक्षक या नात्याने मला अनेकदा मिळालेला आहे. (उत्तरार्ध)
-चंद्रकांत अत्रे, जळगाव

Web Title: Newspaper Drama Review - A Star Workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.