जळगाव तालुक्यातील नागरिक लसीकरणात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:42+5:302021-07-07T04:21:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर जिल्हा प्रशासन भर देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ...

Next in citizen vaccination in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यातील नागरिक लसीकरणात पुढे

जळगाव तालुक्यातील नागरिक लसीकरणात पुढे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर जिल्हा प्रशासन भर देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ९९१ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे, तर त्यात १ लाख ६५ हजार २९८ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यातील जवळपास २६.८२ टक्के लसीकरण एकट्या जळगाव तालुक्यात झाले आहे. एकट्या जळगाव तालुक्यात २ लाख १७ हजार ५४७ नागरिकांनी लस घेतली आहे.

कोरोना लसीकरणाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहता जिल्ह्यात सहज लसीकरण व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.

बोदवड, मुक्ताईनगर, धरणगाव मागेच

जळगाव जिल्ह्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण हे शहरी भागात झाले आहे, तर ग्रामीण भागात राहणारी जनता ही त्या शहरी लोकसंख्येपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणासाठी जनजागृती करण्याची गरज आहे, तसेच तेथे लसींचे डोस वेळेवर मिळावेत, याची गरज निर्माण झाली आहे. बोदवड तालुक्यात आतापर्यंत फक्त १५ हजार नागरिकांनीच लस घेतली आहे, तर मुक्ताईनगर आणि धरणगाव या तालुक्यांमध्येदेखील लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. धरणगाव शहरात लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. मात्र, तालुक्यातील इतर गावांमध्ये लसीकरणावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या तालुक्यांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

शहरी भागात झालेले लसीकरण

४ लाख ४३ हजार ८१८

ग्रामीण भागात झालेले लसीकरण

३ लाख ६७ हजार ४७१

एकूण लसीकरण

८ लाख ११ हजार २८९

तालुकानिहाय झालेले लसीकरण

जळगाव : २ लाख १७ हजार ५४७

भुसावळ ९०,००३

अमळनेर ४५,१७८

चोपडा ४७,३४१

पाचोरा ४१,१३५

भडगाव २८,२२५

धरणगाव - २६,५१५

यावल - ५६,१४६

एरंडोल २२,३६८

जामनेर ५१,५१३

रावेर ५०,७१२

चाळीसगाव ६४,५३७

मुक्ताईनगर २६६४२

बोदवड १५७४५

Web Title: Next in citizen vaccination in Jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.