शासनाच्या निर्णयाने पुढील पिढीला इतिहास कळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:38+5:302021-06-05T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे जिल्ह्यातील मराठा समाजाने स्वागत केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे जिल्ह्यातील मराठा समाजाने स्वागत केले आहे. ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
त्याची पद्धतीदेखील निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने भगवा स्वराज्य ध्वज संहिता दिली आहे. तसेच शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहितादेखील दिली आहे. ६ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वराज्य ध्वज बांधावा, तसेच सूर्यास्ताला तो खाली आणावा, असेही या आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजातील मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.. तसेच जे आपल्या युवकांसाठी आदर्श आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा मिळेल, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मराठा समाजातील प्रमुखांनी म्हटले आहे..
कोट -
हा निर्णय सामान्यांना संस्कृतीशी जोडणारा निर्णय आहे. त्यामुळे आदर्श निर्माण होईल. तसेच आपले जे रियल युथ आयकॉन आहेत. त्यांचीही माहिती पुढच्या पिढीला कळेल, सध्या इतिहास लोप पावत आहे. त्यामुळे या बाबी समोर आल्या पाहिजेत - दीपककुमार पाटील
शासनाचा शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय चांगला आहे. चिन्हांचा उपयोग करणे योग्य आहे. त्यातून चांगला संदेश जाईल - राम पवार, मराठा सेवा संघ
शासनाचा शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय चांगला आहे. त्यातून एक चांगली परंपरा निर्माण होईल. शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे हे योग्यच आहे. - श्रीराम पवार