जळगावात हुडहुडी भरु लागली, रात्रीचा पारा 16.2 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:24 PM2017-10-27T12:24:57+5:302017-10-27T12:31:24+5:30

आला थंडीचा महिना : पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने घट

Night temperature was 16.2 degrees | जळगावात हुडहुडी भरु लागली, रात्रीचा पारा 16.2 अंशावर

जळगावात हुडहुडी भरु लागली, रात्रीचा पारा 16.2 अंशावर

Next
ठळक मुद्देरात्रीची वर्दळ झाली कमीपाच दिवसांपासून तापमानात घट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  गेल्या पाच दिवसांपासून  किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. गुरुवार, 26 रोजी किमान तापमान 16.2 अंशावर आले. त्ययामुळे आता उबदार कपडेही बाहेर पडू लागले असून रात्री रस्तेही लवकर सामसूम होत आहे. 
पावसाळा संपल्यानंतर पितृपक्षात अवकाळी पावसाचाच फटका सर्वत्र बसला. त्यानंतर ऑक्टोबर हिटने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे दोन आठवडय़ांपूर्वी उकाडय़ाने त्रस्त असलेल्या जळगावकरांना थंडीचे वेध लागले होते. त्यानंतर आठवडाभरापासूनच किमान तापमान कमी होऊन दिवाळीनंतर थंडी जाणवू लागली.  तीन दिवसांपासून तर गारवा अधिक वाढला आहे. 

पाच दिवसांपासून तापमानात घट
दिवाळीची धामधूम संपल्यानंतर तापमानात घट होण्यासही सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपासून तापमानात दररोज घसरत असल्याचे चित्र आहे. 22 ऑक्टोबर रोजी 23.4 अंश सेल्सियस किमान तापमान होते. त्यानंतर ते 23 रोजी 20 अंश सेल्सियस, 24 रोजी 18.4, 25 रोजी 17 अंश सेल्सियस, 26 रोजी 16.2 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. 

रात्रीची वर्दळ झाली कमी
रात्री आठ वाजेपासूनच गारवा जाणवू लागल्याने रस्तेही लवकर सामसूम होत आहे. एरव्ही रात्री साडे अकरा- बारा वाजेर्पयत वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर आता दहा ते साडे दहा वाजेदरम्यानच सामसूम दिसून येत आहे. 

उबदार कपडय़ांचा वापर 
थंडी जाणवू लागल्याने  घरातील उबदार कपडे बाहेर काढले जात असून नवीन उबदार कपडय़ांचीही दुकाने थाटली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

पाच दिवसांतील किमान तापमान
22 ऑक्टोबर - 23.4
23 ऑक्टोबर - 20.0
24 ऑक्टोबर - 18.4
25 ऑक्टोबर - 17.0
26 ऑक्टोबर - 16.2
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये). 

Web Title: Night temperature was 16.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.