निकम म्हणतात कोणी भेटले नाही नंतर बघू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:01 PM2019-01-06T12:01:45+5:302019-01-06T12:02:15+5:30

मुंबईतील बैठकीनंतरचे पडसाद

Nikam called someone who does not meet later | निकम म्हणतात कोणी भेटले नाही नंतर बघू

निकम म्हणतात कोणी भेटले नाही नंतर बघू

Next
ठळक मुद्देखडसे म्हणतात दुसऱ्या पक्षाचा विचारच नाही


जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अद्याप ‘अरूणभाई किंवा अन्य कोणी आपणास भेटले नाही... बघू ’अशी सूचक विधान राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. तर आपण किंवा स्रुषा रक्षा यांनी कधीही अन्य पक्षांचा विचार केला नाही असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेसची बैठक पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत झाली. राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमधून कुणाला उमेदवारी द्यावी याची चाचपणीही बैठकीत झाली.
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी प्राधान्य द्यायचे, त्यांनी तयारी न दाखविल्यास अनिल भाईदास पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांना प्राधान्य असेल. त्यांनी सहमती न दर्शविल्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी किंवा माजी आमदार संतोष चौधरी रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील, असा निर्णय या बैठकीत झाला.
अद्याप कोणी भेटले नाही...
कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघ हे राष्टÑवादीकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने बैठकीत उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली. या संदर्भात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले. बैठकीबाबत आपणास माहिती नाही. किंवा आपणास अद्याप आपणास अरूणभाई किंवा अन्य कोणीही नेते भेटले नाही... बघू’ असे सूचक उद्गार त्यांनी काढले. त्यामुळे भविष्यात अरूणभाई गुजराथी त्यांना भेटल्यास ते काय निर्णय घेतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
खडसे म्हणतात दुसऱ्या पक्षाचा विचारच नाही
रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. खडसे व भाजपा पक्षातील नेते मंडळी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ते पक्ष सोडतील अशा चर्चा सतत सुरू असतात. रक्षा खडसे या राष्टÑवादीकडून निवडणूक लढवतील काय? असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, या चर्र्चांमध्ये तथ्य नाही, हे अनेकदा सांगितले आहे. मी किंवा रक्षा खडसे यांनी दुसºया पक्षाचा कधीही विचार केलेला नाही.

Web Title: Nikam called someone who does not meet later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.