अमळनेर पालिकेचे नऊ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 01:37 PM2017-05-15T13:37:01+5:302017-05-15T13:37:01+5:30

आठ सफाई कर्मचारी, एक वाहन चालक अशा 9 जणांना तातडीने निलंबित केले.

Nine employees of Amalner municipal corporation suspended | अमळनेर पालिकेचे नऊ कर्मचारी निलंबित

अमळनेर पालिकेचे नऊ कर्मचारी निलंबित

Next

ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - भाजी बाजारातील दरुगधीयुक्त कचरा न उचलल्याप्रकरणी अमळनेर नगरपरिषदेने आठ सफाई कर्मचारी, एक वाहन चालक अशा 9 जणांना  तातडीने निलंबित केले. तर दोन मुकादमांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
 शहरातील भाजीपाला मार्केट, मच्छी मार्केट, शिरूडनाका, जी. एस. हायस्कुलमागे कच:याचा ढीग साचलेला होता. दोन दिवसांपासून तो न उचलल्याने कचरा कुजून दरुगधी पसरली. तसेच त्यामुळे डुकरांचा त्रास झाला. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सभापती, नगरसेवकांनी नियोजन करून 17 प्रभागात मुकादम व कर्मचा:यांना वेळापत्रक आखून दिले होते. यात्रेच्या स्वच्छतेसाठी खाजगी कर्मचारी काम करीत असताना न.पा.च्या कर्मचा:यांनी कामचुकारपणा केला.
मुख्याधिका:यांच्यावतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी  वाहन चालक शामराव करंदीकर, सफाई कर्मचारी विजय जहॉँगीर बि:हाडे, कैलास श्रावण बैसाणे, सिद्धार्थ रामचंद्र संदानशिव, शे.अकील शे.खलील, दिलभर भगवान बि:हाडे, प्रकाश रमेश सोनवणे, गणेश गोरख सपकाळे, हयात खॉ लतीफ खॉ पठाण यांना 15 मे पासून निलंबनाचे आदेश दिले.
हयातखॉ पठाण हे यात्रेच्याकाळात रजेचाअर्ज न देता परस्पर गैरहजर राहिले होते. तर सफाई कर्मचा:यांना वारंवार मौखिक सूचना देऊनही ते गैरहजर राहत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तसेच कर्मचा:यांकडून कामे करून न घेतल्याने मुकादम अनिल बाविस्कर, बलराम गिरधारी हटवाल यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मुकादमांकडून तीन दिवसाच्या आत खुलासा मागितला आहे. या कारवाईमुळे  सफाई कर्मचा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Nine employees of Amalner municipal corporation suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.