पाचोऱ्याच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयातील नऊ जण क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:33 PM2020-04-28T12:33:57+5:302020-04-28T12:34:19+5:30
३६ जणांचा शोध सुरू आहे
जळगाव : पाचोरा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरच्या नऊ जणांना क्वॉरंटाईन केले आहे. तसेच संपर्कातील ३६ जणांचा शोध सुरू आहे.
बँक बंद, परिसरात फवारणी
पाचोरा येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. भूषण मगर, डॉ. अमित साळुंखे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी केली असून तेथील बँक तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या भागात फवारणी करण्यात आली.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील १३ जण कोरोना रुग्णालयात
पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील १३ जणांना जळगाव येथे कोरोना रुग्णालयात रवाना करण्यात आले. यात पाच महिला, चार पुरुष, चार मुले यांचा समावेश आहे. पाचोरा शहरातील रस्ते ओस पडले असून मानसिंग कॉलनी रस्ता नागरिकांनी काटे टाकून बंद केला आहे.