आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:21 PM2019-04-17T13:21:51+5:302019-04-17T13:22:34+5:30

पेपर तपासणीत हलगर्जीपणाचा आरोप

Nine zero marks now 51 marks: 1068 out of 2352 students failing in recruitment | आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास

आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. अनुत्तीर्ण २ हजार ३५२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्मुल्यांकन तपासणी केली असता त्यात १ हजार ६८ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची बाब उघड झाली आहे़
या प्रकाराबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंकडे तक्रार केली असून सात दिवसांच्या आत हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे़
नोव्हेबर-२०१८ च्या पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) परीक्षेचा निकाल हा २५ व २७ फेब्रुवारी तसेच ५, १३ त्यानंतर १५ मार्च व १० एप्रिल २०१९ ला कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला़ यामध्ये विविध विषयात पन्नास टक्केपर्यंत विद्यार्थ्यांच्या निकालात बदल होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यामध्ये बीएससी़ एस़वाय, बीएससी़टी़वाय, बीसीए, बीकॉम़टी़वाय, बीकॉम़ एस़वाय, बीबीएम, बीएमसी च्या सुमारे २ हजार ३५२ अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले होते़ त्यापैकी १ हजार ६८ विद्यार्थी जाहीर झालेल्या निकालात उर्त्तीण झाल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणत पुनर्मुल्यांकन निकालात झालेल्या बदलामुळे पेपर तपासणी कशा प्रकारे झाली असेल? असा प्रश्न निर्माण होत आहेत.
कुलगुरूंची घेतली भेट
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे १८ मार्चला विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालनक बी़पी़ पाटील यांना निवदेन देण्यात आले होते़ सोबतच पेपर तपासणीत निष्काळजी करणाºया प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणाला गांभीर्याने घेतले गेले नसल्यामुळे सोमवारी अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी भेट घेतली व या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली़ तसेच प्राध्यापकांवर कारवाई करावी व पुनर्मुल्यांकनमध्ये गुण वाढणाºया विद्यार्थ्यांना ५० टक्के पुनर्मुल्यांकन शुल्क कोणत्याही प्रकारचे अर्ज न करता परत मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
शून्य गुण अन् तपासणीनंतर मिळाले ५१ गुण
विशेष म्हणजे, शून्य प्राप्त असणाºया बैठक क्रमांक ३५१०६५ असलेल्या विद्यार्थ्यांला तपासणीनंतर ४० गुण मिळाले आहे़ त्यानंतर बैठक क्र.३३१२७२ या शुन्य गुण असलेल्या विद्यार्थ्याला सुध्दा पुनर्मुल्यांकन तपासणीनंतर ५१ गुण मिळाले आहेत. बैठक क्र.३४७९३४ असलेल्या विद्यार्थ्याचे १८ चे ४० गुण झालेले आहेत़ त्यामुळे प्राध्यापकांकडून पेपर तपासणी होती की नाही, असा प्रश्न अभाविपकडून उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचाही आरोप केला आहे़ यापूर्वी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकन तपासणीत झालेल्या गुण वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतु विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची पेपर तपासणीत खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येते व यामुळे पुनर्मुल्यांकन तपासणीत शैक्षणिक, आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे, असे म्हटले आहे़
पुनर्मुल्यांकन तपासणीसंदर्भात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे़ या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांना सूचना केल्या आहेत. -पी़पी़पाटील, प्रा़, कुलगुरू, विद्यापीठ़

Web Title: Nine zero marks now 51 marks: 1068 out of 2352 students failing in recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव