असह्य वेदना होणाऱ्या आजाराने नशिराबादकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:30 PM2018-08-26T13:30:35+5:302018-08-26T13:31:27+5:30

खळबळ

Nishirabadkar Harihan by a pain in a painful pain | असह्य वेदना होणाऱ्या आजाराने नशिराबादकर हैराण

असह्य वेदना होणाऱ्या आजाराने नशिराबादकर हैराण

Next
ठळक मुद्देआरोग्य प्रशासनाने दखल घेण्याची मागणीविकारामुळे ग्रामस्थ धास्तावून गेले

नशिराबाद, जि. जळगाव : गावात अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, लाल काळे डाग पडणे, त्याठिकाणी त्वचेतून पाणी येवून बुरशी आल्या सारखे होणे असे असह्य वेदना होणाºया आजाराने नशिराबादला डोकेवर काढले आहे. शेकडो जण या फंगल्स इन्फेक्शन, संसर्गजन्यसारख्या रोगाने पछाडलेले असल्याने खळबळ उडाली आहे.
सुस्त आरोग्य प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. शरीरावर झपाट्याने वाढणा-या या विकारामुळे ग्रामस्थ धास्तावून गेले आहे.
गावात अवेळी व आठवड्यातून एकदाच होणारा पाणीपुरवठा व अस्वच्छता, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाने रुग्ण फणफणले आहे. त्यातच अंगाला खाज सुटून त्वचेवर डाग पडणे यामुळे अस्वस्थता वाढून अशक्तपणा जाणवणे, असा विकार झालेले सुमारे पाचशे जण बाधीत झाले असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांंनी आरोग्य प्रशासनाकडे केली आहे. तत्काळ यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी होत आहे. शरीराला खाज सुटणे,पुरळ उठणे असे रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध औषधी देण्यात आहे, मात्र आजाराची लक्षणे मोठी असल्याने उपलब्ध औषधी त्यावर प्रतिसाद देत नाही, त्यासाठी जादा पावरची औषधी गरजेची असल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे औषधांची मागणी केली आहे. रुग्णांच्या सर्व्हेक्षणाचे कामास सुरुवात झाली आहे, अशी माहिती नशिराबाद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरफान तडवी यांनी दिली.

Web Title: Nishirabadkar Harihan by a pain in a painful pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.