चार दिवसात महापालिकेला ४५ टक्के वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:23+5:302021-03-27T04:16:23+5:30
जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे महापालिकेला ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान पार ...
जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे महापालिकेला ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान पार पाडावे लागत आहे. महापालिकेची आतापर्यंत ५५ टक्के वसुली झाली असून, उर्वरित चार दिवसात महापालिकेला ४५ टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे. जळगाव महापालिकेची एकूण मालमत्ता कराची वसुली ७५ कोटी इतकी आहे. दरवर्षी हे उद्दिष्ट ६० कोटी रुपयांपर्यंत जाते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वसुलीवर परिणाम झाला होता. यावर्षी महापालिकेने वसुलीसाठी अभय योजना राबून गेल्या वर्षाचे उद्दिष्ट व या वर्षाचे उद्दिष्ट देखील पूर्ण करण्याची योजना आखली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने, मनपाच्या वसुलीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच महापालिकेचे अनेक कर्मचारीदेखील कोरोना बाधित झाल्याने वसुली मंदावली आहे. आतापर्यंत ४२ कोटी रुपयांची वसुली झाली असून, उर्वरित पाच दिवसात ३१ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे.