१४ मार्चला एनएमएमएस परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:23+5:302021-01-22T04:15:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १४ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातून २ हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यार्ला अर्ज करता येतो. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ हजार ७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ११४ केंद्रांवर होणार आहे.
तालुकानिहाय परीक्षार्थी विद्यार्थी
अमळनेर (१६४), भडगाव (४४), भुसावळ शहर (६३), भुसावळ ग्रामीण (६१), बोदवड (६८), चाळीसगाव (२७१), चोपडा (३४४), धरणगाव (९१), एरंडोल (५५), जळगाव ग्रामीण (१२७), जळगाव शहर (११३), जामनेर (३१५), मुक्ताईनगर (४१), पाचोरा (१४२), पारोळा (३८), रावेर (७४), यावल (६८).