२१ मार्चला एनएमएमएस परीक्षा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:34+5:302021-03-10T04:17:34+5:30
जळगाव : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी घेतली जाणारी एनएमएमएसची परीक्षा ही आता २१ मार्च रोजी ...
जळगाव : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी घेतली जाणारी एनएमएमएसची परीक्षा ही आता २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, या परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
एनएमएमएस परीक्षा ही यंदा जिल्ह्यातील ९ केंद्रावर घेतली जाणार आहे. यात २०७९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. १४ मार्च रोजी एमपीएससी राज्य सेवेची परीक्षा असल्याने एनएमएमएस परीक्षेची तारीख बदलून २१ मार्च करण्यात आली. ही परीक्षा ए. टी. झांबरे विद्यालय (जळगाव), जी. एस. हायस्कूल (पाचोरा), ए. बी. हायस्कूल (चाळीसगाव), संत गाडगेबाबा विद्यालय (भुसावळ), सानेगुरुजी विद्यालय (अमळनेर), न्यू इंग्लिश स्कूल (जामनेर), कुडे हायस्कूल (धरणगाव), के. नारखेडे विद्यालय (भुसावळ), प्रताप विद्यालय (चोपडा) या शाळांमध्ये घेतली जाणार आहे.