घोषणा नको, अंमलबजावणी व्हावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:47 PM2018-12-22T23:47:57+5:302018-12-22T23:52:00+5:30
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सचिन देव
जळगाव : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घरामुळे बहिणाबाईच्या आठवणी कायम स्वरुपी जिवंत राहणार असून,स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केली असली तरी, त्याची अंमलबजावणीदेखील लवकर करण्याची मागणी जोर धरु लागलीअहे. इतकेच नव्हे तर सध्या बहिणाबाईंच्या घरात राहत असलेल्या सरोदे कुटुंबियांनीदेखील स्मारकासाठी घर देण्यासाठी राजी झाले असून, लवकरात लवकर शासनाने घर खरेदी करण्याची मागणी केली आहे.
आपल्या कवितांमधुन जीवनाचे तत्वज्ञान शिकविणाºया व खान्देशचे नाव जगाच्या कानाकोपºयात नेणाºया कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिल्यानंतर पुन्हा एकदा बहिणाबाईच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. विद्यापीठाला त्यांचे नाव मिळाल्यानंतर सर्वत्र फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यानंतर पुन्हा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाईच्या जन्मघर खरेदी करुन, त्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, पुन्हा एकदा खान्देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने आता हे घर लवकर खरेदी करुन, स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी खान्देशवासियांतर्फे करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर बहिणाबाई चौधरी यांचे घर खरेदी केलेल्या गावातील नागरिक सिताराम राजाराम सरोदे यांनीदेखील बहिणाबाईच्या स्मारकासाठी घर विक्री करण्यास तयारी दर्शविली आहे.
त्यांनी१९६२ मध्ये कवयित्री बहिणाबाई यांच्या नातलगांपासूनअवघ्या ६ हजार रुपयांत घर खरेदी केले होते. काळानुरुप रस्त्यांची उंची वाढल्याने, घरदेखील रस्त्याच्या समान आले आहे. मात्र, दीडशे वर्षानंतरही घराची स्थिती जैसे थे मजबूत आहे. संपूर्ण घर सागवानी लाकडाने सागवानाने उभारले असून, घराचे बांधकाम दुमजली आहे. खाली तीन खोल्या आणि वरच्या मजल्यावर दोन खोल्या आहेत. घरातील सºयांच्या लाकडी भीमवर आकर्षक कलाकृती साकारली आहे. घराच्या भीतींदेखील मजबूत आहेत. विशेष म्हणजे घरात पावसाळ््यात कुठेही एक थेंबदेखील पाझरत नसल्याचे या घरात राहणाºया सरोदे कुटुंबियांनी सांगितले. बहिणाबाईचा या घरात १८८० मध्ये जन्म झाला असून, या आधीहीं या घराची उभारणी करण्यात आली आहे.
जाता जाता पर्यटन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत असून, आता स्थानिक नेत्यांनी याचा पाठपुरावा करुन, अंमलबजावणी करण्याची मागणी जिल्हावासियांतर्फे करण्यात येत आहे.