दाढी, कटींग केली नाही म्हणून कैचीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:01 PM2019-11-30T23:01:40+5:302019-11-30T23:02:47+5:30

विटनेर येथील घटना : नाभिक समाजाचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

No beard, no cutting, so scissors hit the boat's neck | दाढी, कटींग केली नाही म्हणून कैचीने वार

दाढी, कटींग केली नाही म्हणून कैचीने वार

Next


चोपडा : तत्काळ दाढी व कटिंग करण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत असलेल्या ग्राहकाने दुकानमालकाच्या मानेवर कैचीने वार केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
या घटनेने गावात प्रचंड खडबळ उडाली असून याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चोपडा तालुका नाभिक समाज संघटनेने लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याकडे केली आहे.
विटनेर येथील रहिवासी मच्छिंद्र रामकृष्ण सैंदाणे (वय २८) याचे गावात सलूनचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुकानात दाढी करीत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रकाश लालचंद कोळी हा दारुच्या नशेत मच्छिंद्र सैंदाणेच्या दुकानावर आला. त्याने आताच्या आता तू माझी दाढी व कटींग करून दे, असे सांगितले.
यावेळी सलून दुकान चालक मच्छिंद्र सैंदाणे याने माझ्याकडे पाहुणे आल्यामुळे मला दुकान बंद करायचे आहे, तुझी दाढी व कटींग सकाळी करून देतो, असे सांगितले. परंतु याचा राग आल्याने प्रकाश कोळी याने दारूच्या नशेत सलून दुकानातील ड्रॉवरवर असलेली कैची उचलून सलून चालक सैंदाणे यांच्या मानेवर उजव्या बाजूला खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी चंद्रकांत कोळी व शुभम ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी आवराआवर करून मच्छिंद्र सैंदाणे याची सुटका केली.
याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला मच्छिंद्र रामकृष्ण सैंदाणे रा.विटनेर याच्या फिर्यादीवरून प्रकाश लालचंद कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कान्स्टेबल नामदेव महाजन करीत आहेत.

Web Title: No beard, no cutting, so scissors hit the boat's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.