शुल्क बाकी नाही, तरीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:18 AM2021-05-21T04:18:28+5:302021-05-21T04:18:28+5:30

विद्यार्थ्याने केली तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षण शुल्क कुठलेही बाकी नाही. तरी देखील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ...

No charges left, though | शुल्क बाकी नाही, तरीही

शुल्क बाकी नाही, तरीही

Next

विद्यार्थ्याने केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षण शुल्क कुठलेही बाकी नाही. तरी देखील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील चेअरमन अतिरिक्त तीस हजार रुपये शिक्षण शुल्क मागत आहे. तसेच परीक्षा अर्ज भरू देत नसल्याबाबत महाविद्यालयातील कृष्णा मोरे या विद्यार्थ्याने समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील सुमनताई फार्मसी महाविद्यालयात कृष्णा मोरे हा विद्यार्थी डी.फार्मसीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती आलेली असताना सुद्धा महाविद्यालयाचे चेअरमन यांच्याकडून शिक्षण शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. कुठलेही शुल्क बाकी नसताना शिक्षण शुल्‍क मागून त्रास दिला जात आहे, अशी तक्रार विद्यार्थ्याने केली आहे. तसेच मदत करावी; अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: No charges left, though

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.