चॉकलेट नको, मला सॅनिटाझर हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:05+5:302021-02-09T04:18:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना चॉकलेट, नवीन शैक्षणिक साहित्य असे विविध प्रलोभने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना चॉकलेट, नवीन शैक्षणिक साहित्य असे विविध प्रलोभने दाखविली जातात. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या मागणी बदलली असल्याचे पहावयास मिळत आहे. शाळेत जाण्यापूर्वी चॉकलेट नको, मला नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल हवी, असा हट्ट मुले धरू लागली आहेत. मुलांच्या हट्टामुळे गेल्या आठवडाभरामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेली मुले आता शाळेत नियमित जायला लागली आहे़ शंभर टक्के शाळा सुरू झाल्या असून त्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या आहेत. शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थी पेन, पेन्सिल, वही, पेन तसेच पुस्तक या शैक्षणिक साहित्यांसह चॉकलेट व बिस्किटांची मागणी करतात. मात्र, या हट्टांमध्ये आता बदल झालेला दिसून येत आहे. पाल्य शाळेत जाण्यापूर्वी आता पालकांकडे सॅनिटायझरची बॉटल, मास्कची मागणी करताना दिसून येत आहे़ जसे मित्राने रंगीत डिझाईनचे मास्क आणले, त्याप्रमाणे मलाही मास्क आणावा, असा हट्ट पाल्य करत असल्याचे पालकांनी सांगितले.
डिझाईनच्या मास्कची क्रेझ
शाळेत आपले मास्क सर्वात चांगले आणि हटके दिसावे, यासाठी मुलींमधून डिझाईनच्या मास्कची क्रेझ वाढली आहे. बाजारातसुध्दा वेगवेगळ्या रंगाचे व डिझाईनचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यातही विविध फुलांच्या डिझाईनच्या मास्कला मुली पसंती देत आहेत.
दप्तरात घेतली सॅनिटायझरने जागा
सद्या मेडिकलमध्ये पंधरा रुपयांपासून सॅनिटायझरच्या बॉटल विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यामध्ये जेलीवाल्या सॅनिटायझरलासुध्दा अधिक पसंती दिली जात आहे. त्यातच आधी विद्यार्थ्यांना दप्तरात पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी दिले जात होते. आता त्यासोबत सॅनिटायझरने दिले जाते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या दप्तरात सॅनिटायझरने जागा घेतली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे़ पण धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे दक्षता म्हणून स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर नेत आहे. मास्कचा शाळेत व घरात सुध्दा नियमित वापर करीत आहे.
- आकाश पाटील, विद्यार्थी
एकूण पाचवी ते आठवी विद्यार्थी
३ लाख ३४ हजार ८५२
००००००००००००००००००
एकूण शाळा
२ हजार ५८
०००००००००००००००००
एकूण शिक्षक
११ हजार ९७९
०००००००००००००००००
एकूण शिक्षकेतर कर्मचारी
३ हजार ३