परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:22+5:302021-03-18T04:16:22+5:30
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. ही परीक्षा शहरातील १६ ...
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. ही परीक्षा शहरातील १६ उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत होईल. परीक्षेच्यावेळी गैरप्रकार होऊ नये यासाठी शहरातील परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रवेशास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बंदी घातली आहे.
००००००००००००००००००
ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २२ व २३ मार्च या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ११५ रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे.
००००००००००००००००००
कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतक-यांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक शेतक-यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
०००००००००००००००००००
रोटरी मिडटाऊन तर्फे हर्षाली चौधरी यांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे ८० विशेष मुलांचा सांभाळ करणाऱ्या हर्षाली चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. रेखा महाजन यांनी तर परिचय डॉ. प्रतिभा हरणखेडकर यांनी करुन दिली. आभार सुनंदा देशमुख यांनी तर शशी अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमात सहप्रांतपाल डॉ. अपर्णा मकासरे, जितेंद्र ढाके आदींची उपस्थिती होती.