सिंधी कॉलनीतील सीसीसीत औषधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:52+5:302021-03-20T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तक्रारी वाढल्या असून आता या ठिकाणी रुग्णांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तक्रारी वाढल्या असून आता या ठिकाणी रुग्णांना औषधी मिळत नसल्याची तक्रकार समोर आली आहे. काही रुग्णांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र, चुकीच्या तक्रारी होत असून आमच्याकडे पुरेशा औषधी आहेत. त्या रुग्णांना गरजेनुसार दिल्या जातात, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
सिंधी कॉलनीत असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी दोन दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. यात दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील रुग्णांना खाली उतरून ये- जा करावी लागत असल्याचे रुग्णांचे म्हणणे होते. गुरुवारी या ठिकाणी एक रुग्ण रात्रभर बेशुद्धावस्थेत पडून होता, असा आरोप नातेवाईकांनी केला होता. आता या ठिकाणी औषधी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
आपल्याकडे ॲन्टीबायोटीक, ओरएस, सर्व औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांना त्या आवश्यकतेनुसार दिल्या जातात. - डॉ. विजय घोलप, वैद्यकीय अधिकारी.