कुणालाही खूश करण्यासाठी बैठक नाही - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:20 PM2018-11-11T12:20:01+5:302018-11-11T12:20:34+5:30

कॉँग्रेस ५० वर्षे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार नाही

No meeting to please anyone - Raosaheb Danwei | कुणालाही खूश करण्यासाठी बैठक नाही - रावसाहेब दानवे

कुणालाही खूश करण्यासाठी बैठक नाही - रावसाहेब दानवे

Next

जळगाव : आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. सर्व पक्ष विरूद्ध भाजपा अशी परिस्थिती देशात आणि राज्यात आहे. २०१९ ची निवडणूक जिंकाल तर कॉँग्रेस येती ५० वर्षे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार नाही. आजची बैठक ही संघटनेचा आढावा घेण्यासाठी आहे, कुणाला खूश करण्यासाठी नाही असा चिमटा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे आयोजित बैठकीत घेतला.
जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, न.पा., मनपा सदस्य, तालुका अध्यक्षांची बैठक शहरातील ब्राह्मण संघाच्या सभागृहात आयोजिण्यात आली होती. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे,प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार ए.टी. पाटील, माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, महापौर सिमा भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांकडे ‘नाना’ नाही
ए.टी. नाना यांचा उल्लेख करून दानवे म्हणाले, ए.टी. पाटील यांंना उच्चांकी मतदान झाले. प्रत्येक मतदार संघात असे ‘नाना’ नाहीत. त्यांचा विजय पक्षाची काही मदत व अन्य काही युक्त्यांनी झाला असे दानवे म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.
भ्रमात राहू नका
नवीन मतदार वाढविणे यावर भर द्या आपल्याबरोबर असलेले जुने टिकवून नवीन मतदार वाढवा. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी १० जण स्पर्धेत आहेत. आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत. मात्र भ्रमात राहू नका. मी येथे कुणाला खूश करण्यासाठी आलो नाही, असा चिमटा घेऊन आगामी काळात निवडणूक जिंकायची असेल तर यंत्रणा उभी करा. २०१९ ची निवडणूक जिंकाल तर येती ५० वर्र्षे कॉँग्रेस निवडणूक लढविण्याची हिंमत करणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.
खडसे - महाजन शेजारी शेजारी
बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शेजारी-शेजारी बसविण्यात आले होते. दोघेही दानेवेंनी केलेल्या कोटीवर हसत होते. मात्र ते एकमेकांशी फारसे बोलले नाही. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी तर राजकीय विश्लेषण मांडणी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केली.
कार्यकर्त्यांना काढले बाहेर
बैठकीस कुणाकुणाची उपस्थिती अपेक्षित आहे हे अगोदर सांगण्यात आले. ही बैठक सभा नाही, त्यामुळे अन्य अपेक्षित नसलेले सभागृहात असतील तर त्यांनी बाहेर जावे अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. पत्रकारही बैठकीत अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.
पालकमंत्री भेटलेच नाही
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाचोऱ्यात आले असताना ते आम्हाला न भेटता किंवा न सांगता विरोधक आर. ओ. पाटील यांच्याकडे गेले. पक्ष आमच्याकडून अपेक्षा ठेवतो तशी अपेक्षा आमचीही असल्याचे पाचोरा तालुका प्रमुखांनी गाºहाणे तालुक्याची माहिती देतांना मांडले.
लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी करा
लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना पुढील सप्टेंबरमध्ये होणाºया निवडणुकीचीही तयारी करा, असे संघटनमंत्री विजय पुराणिक यावेळी म्हणाले. २०१४ ची निवडणूक आपण सोशल मिडियाच्या बळावर जिंकली. ती कला आता इतरांनीही साध्य केली आहे. आता लोकसभा, विधानसभा मतदार संघात एक खास टीम तयार करा. साशेल मिडियाचा प्रभावी वापर करा असेही पुराणिक म्हणाले.

Web Title: No meeting to please anyone - Raosaheb Danwei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.