पैसे नसल्याने रस्त्यांची कामे थांबवा अथवा मालमत्ता विकून कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:41 PM2019-08-29T12:41:22+5:302019-08-29T12:42:12+5:30

पंतप्रधानांचे गडकरींना पत्र : खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

 With no money, stop road works or sell property | पैसे नसल्याने रस्त्यांची कामे थांबवा अथवा मालमत्ता विकून कामे करा

पैसे नसल्याने रस्त्यांची कामे थांबवा अथवा मालमत्ता विकून कामे करा

Next

जळगाव : पैशांअभावी रस्त्यांची कामे थांबविण्याचे अथवा मालमत्ता विकून कामे करण्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरींना दिले असल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी जळगाव येथे राष्टÑवादी भवनात आयोजित पत्रपरिषदेत केला.
संवाद यात्रेनिमित्त त्या सायंकाळी जळगावात पोहचल्या. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रपरिषदेनंतर त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या की, घरातील सोने विकणे हा मंदीवर उपाय नाही. ७० वर्षात काँग्रेस-राष्टÑवादीने मंदीचे संकट येऊ दिले नाही. मात्र आज केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह निधीवरही डोळा ठेवत आहे.
शिखर बँकेशी संबंध नाही
शरद पवार यांचा शिखर बँकेशी काहीही संबंध नाही.ते बँकेचे चेअरमन नव्हते, बुद्धीला पटतील असे तरी आरोप करा, असेही त्या म्हणाल्या.
चाळीसगाव
चाळीसगाव येथे बुधवारी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या समस्या, मतेही जाणून घेतली. त्यांच्यासोबत सेल्फी काढत बुधवारची सकाळ एन्जॉय केली.
पारोळा
पारोळा चोरवड रोडवर असलेल्या विजय लॉन्स येथे खासदार सुळे यांच्या ‘संवाद तार्इंशी’ हा कार्यक्रम २८ रोजी आयोजित करण्यात आला.

भाजपला राष्टÑवादीची सर्वाधिक भिती
सध्याच्या स्थितीत भाजपला राष्टÑवादी काँग्रेसचीच भिती वाटते. त्यामुळेच राष्टÑवादी विरोधात अधिकाधिक कुरापती सुरू आहेत. भाजपने जर संघटन बांधले आहे तर मग बाहेरच्या पक्षातून नेते आणून आयत्या बिळावर नागोबा का केले जात आहे? अजून ४५ दिवस आपल्यावर आरोप होतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Web Title:  With no money, stop road works or sell property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.