कोरोना अहवालासाठी आता केंद्रावर जाण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:30+5:302021-05-29T04:14:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरेाना तपासणी होऊन प्रयोगशाळेत निदान झाल्यानंतर, आता काही तासांत संबंधितांच्या मोबाइलवर याचा अहवाल प्राप्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरेाना तपासणी होऊन प्रयोगशाळेत निदान झाल्यानंतर, आता काही तासांत संबंधितांच्या मोबाइलवर याचा अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णांची केंद्रावरील खेप वाचणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत हा उप्रकम राबविला जात असून, रेडक्रॉस रक्तपेढी व काही दात्यांनी पुढाकार घेऊन क्लाउड पॅथॉलॉजीचे सॉफ्टवेअर खरेदी केले असून, त्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन या सॉफ्टवेअरबाबत माहितीही जाणून घेतली.
कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी झाल्यानंतर रुग्णांचे निदान होऊनही अनेक दिवस रिपोर्टसाठी रुग्णांची वणवण होत असे. अनेक वेळा केवळ रिपोर्ट नसल्याने रुग्णालयात दाखल करून घेता येत नव्हते. मात्र, रेडक्रॉस रक्तपेढी, तसेच रतनलाल बाफना ज्वेलर्स, एस.के ऑइल मिल, सीए अभयराज चोरडिया आणि वीरू शाह, जामनेर यांच्या पुढाकारातून पुणे येथील क्लाउड पॅथॉलॉजीचे सॉफ्टवेअर खरेदी केले असून, यामुळे पुढील १ लाख रुग्णांना निदानानंतर सहा तासांच्या आत मोबाइलवर रिपोर्ट मिळणार आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हबाबतची माहिती, एक लिंक व त्या लिंकवर पीडीएफ रिपोर्ट प्राप्त होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, डॉ.विजय गायकवाड, डॉ.किशोर इंगोले, डॉ.शुभांगी डांगे, डॉ.प्रियंका पाटील, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी हे उपस्थित होते.