हातात नाही दाम, कुणी काम देता का काम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:47+5:302021-05-19T04:16:47+5:30

स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; चालक-मालकांसमोर आर्थिक संकट वाढले - स्टार : 728 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

No price in hand, does anyone give work ... | हातात नाही दाम, कुणी काम देता का काम...

हातात नाही दाम, कुणी काम देता का काम...

Next

स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; चालक-मालकांसमोर आर्थिक संकट वाढले

- स्टार : 728

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालय सुरू करण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने या शाळांमधील स्कूल-बसवर अवलंबून असणाऱ्या चालक-मालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तब्बल १४ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, काही बस चालकांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे तर काही शहरातील विविध कंपनीत मजुरीने कामाला जात आहेत.

गेल्या वर्षभरापासून शाळा-महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस चालक-मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काहींनी बँकांचे कर्ज काढून, स्कूल बस खरेदी केलेल्या आहेत. मात्र, गेल्या १४ महिन्यापासून शाळा बंदमुळे उत्पन्नही बंद असल्याने, या कर्जाची परतफेड करायची कशी, या विवंचनेत मालकवर्ग सापडले आहेत. दरम्यान, ज्या शाळांकडे स्वत:च्या स्कूलबसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे. मात्र, बसेस बंद असल्याने या चालकांचे वेतनही बंद झाले आहे. त्यामुळे अनेक चालक व मालकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यात काही जण भाजीपाला विक्री करत आहेत तर काहीजण कंपनीत कामाला जात आहेत.

============

१) गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, माझी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल व्हँन जागेवरच उभी आहे. उत्पन्नाचे साधन बंद असल्यामुळे आता एका कंपनीत कामाला जात आहे. स्कूल बसेस बंद असल्यामुळे आमच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने इतर घटकांप्रमाणे आम्हालाही आर्थिक मदत करावी.

- बापू कुमावत,

कंपनीत काम करत आहेत.

----------

२) शहरातील एका शाळेवर माझी स्वतःची एक व्हॅन आहे. मीच चालक म्हणून काम करतो. मात्र, गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्याने, माझी गाडी घरीच आहे. घर चालविण्यासाठी हंगामा नुसार विविध व्यवसाय करीत आहे. शासनाने आम्हाला अद्याप कुठलीही आर्थिक मदत केली नाही. आमच्या अडचणींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

- नरेंद्र पाटील, हंगामी व्यवसाय करत आहेत.

----------

३)शाळा बंद असल्याने, विद्यार्थ्यांना ने-आण करणारी माझी बसही बंद आहे. उत्पन्नाचे साधनचं बंद असल्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहे. मात्र, व्यवसाय करण्यासाठी सकाळी ११ पर्यंतची परवानगी असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही.त्यामुळे शासनाने काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे.

-सोपान पाटील, शहरात भाजीपाला विकत आहेत.

--------

४) कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, स्कूल बसेस जागेवर उभ्या आहेत. यामुळे उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने, मी घरीच बसून आहे. इतर ठिकाणी कुठल्या कार्यक्रमाची वर्दी भेटल्यावर जात असतो. वर्षभरापासून शासनानेही इतर घटकांप्रमाणे स्कूल बस चालक व मालकांना मदत न केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- विनोद कुमावत,

अध्यक्ष, स्कूल बस विद्यार्थी वाहतूक संघटना

------

कोरोनामुळे पहिल्यांदाच गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने, पर्यायाने माझी रिक्षाही बंद आहे. यामुळे दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतून येणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे चांगला रोजगार शोधत आहे.

- बंडू वाणी, सध्या रोजगार शोधत आहेत

--------

किमान आर्थिक मदतीची मागणी

गेल्या वर्षभरापासून शाळा-महाविद्यालय बंद असल्याने याचा परिणाम स्कूल बस चालक व मालकांवर झाला आहे. त्यामुळे शासनाने स्कूल बस वरील चालक मालकांनाही किमान दर महिन्याला पाच हजार रुपये इतकी मदत करावी, तसेच ज्यांनी मासिक हफ्त्याने वाहन खरेदी केले आहे. त्यांना कर्जात सवलत द्यावी. तसेच इतर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगीही देण्याची मागणी या स्कूल बस चालक-मालकांनी केली आहे.

---------

१) २५ हजार मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे

२) शहरातील एकूण बसेस १ हजार ८००

३)शहरातील एकूण चालक २ हजार

Web Title: No price in hand, does anyone give work ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.